अवैध धंदे सुसाट; बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:18 IST2021-07-27T17:15:16+5:302021-07-27T17:18:05+5:30

विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले निलंबित

Illegal trades rised; Balapur Thanedar Ravi Hundekar suspended | अवैध धंदे सुसाट; बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर निलंबित

अवैध धंदे सुसाट; बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर निलंबित

ठळक मुद्देकार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असल्याचा ठपका एक वर्षापूर्वी ठाणेदार पदाचा कार्यभार घेतला होता.

आखाडा बाळापूर : येथील ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी तडकाफडकी निलंबित केले. 

आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी एक वर्षापूर्वी ठाणेदार पदाचा कार्यभार घेतला होता. गेल्या काही दिवसात अवैध धंद्यांनी डोकेवर काढले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून मटका, जुगार व अवैध दारू धंद्यांवर विशेष पथकामार्फत छापे मारण्यात आले. यामुळे ठाणेदार रवी हुंडेकर यांनी कर्तव्यात कसूर  केला आहे. त्यांना अवेध धंद्यांवर प्रतिबंध घालण्यात अपयश आले असा ठपका ठेवण्यात आला. 

विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांची करडी नजर परिक्षेत्रातील घडामोडींवर आहे. ठाणेदार हुंडेकर अवैध धंद्यांवर प्रतिबंध करत नाहीत असा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले. ठाणेदाराला तडकाफडकी निलंबित केल्याने बाळापूर परिसरात या चर्चेला उधाण आले आहे.
 

Web Title: Illegal trades rised; Balapur Thanedar Ravi Hundekar suspended