गारपीटग्रस्त जनावरांना सकस, प्रोटीनयुक्त आहार द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:56+5:302021-02-24T04:31:56+5:30

हिंगोली : मागील आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे जनावरे जखमी झाली असल्यास त्यांना सकस आणि प्रोटीनयुक्त आहार द्यावा, असा सल्ला वसंतराव ...

Hail-infected animals should be given a nutritious, protein-rich diet | गारपीटग्रस्त जनावरांना सकस, प्रोटीनयुक्त आहार द्यावा

गारपीटग्रस्त जनावरांना सकस, प्रोटीनयुक्त आहार द्यावा

हिंगोली : मागील आठवड्यात झालेल्या गारपिटीमुळे जनावरे जखमी झाली असल्यास त्यांना सकस आणि प्रोटीनयुक्त आहार द्यावा, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी दिला आहे.

गारपिटीमुळे जनावरांच्या शरीरावर गारांचा मार लागल्यामुळे जखमा झाल्या आहेत. जखमांचे स्वरूप पाहून त्या पोटॅशियम परमॅगनेट द्रवनाने किंवा आयोडिनने स्वच्छ धुऊन नंतर मलमपट्टी करावी. याचबरोबर गारपीटग्रस्त जनावरांना सकस आहार, प्रोटीन आणि ऊर्जायुक्त आहार देणे आवश्यक आहे. पाण्यातून क्षार, गूळ मिसळून द्यावा, तसेच ताण प्रतिरोधक औषधी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी औषधी पाण्यातून द्यावीत. एवढेच नाही तर जवळच्या पशुवैद्यकांशी संपर्क साधून जनावरांवर उपचार करावेत, असेही आवाहन केले आहे.

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मि. लि. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे आवश्यक आहे. वेळीच फवारणी केल्यास मक्यावरील अळी नष्ट होईल.

Web Title: Hail-infected animals should be given a nutritious, protein-rich diet