शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला पळवून लावण्याची प्रार्थना करून उभारली स्मशानात गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

हिंगोली: गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. एवढेच काय, अनेकांना इहलोकही ...

हिंगोली: गत दीड वर्षांपासून कोरोना महामारीने सर्वत्र कहर माजविला आहे. अनेकांना बेघर व्हावे लागले आहे. एवढेच काय, अनेकांना इहलोकही सोडावा लागला आहे. या वर्षी कोरोना महामारी हा आजार माणसांपासून दूर जावा, सर्वांच्या घरात सुखसमृद्धी नांदावी, अशी प्रार्थना मसनजोगी समाजाने स्मशानभूमीत गुढी उभारून केली. शहरातील अकोला बायपास रोडवर मसनजोगी समाजाची सात कुटुंबे वास्तव्यास आहेत. स्मशानभूमीत आलेल्या प्रेताचे दहन करण्याचे काम हे कुटुंबे वर्षानुवर्षे आजतागायत करीत आहेत. विशेष म्हणजे, प्रेताचे दहन करण्यासाठी हा समाज कोणतीही अट घालत नाहीत. प्रेताचे दहन केल्यानंतर जे पदरात पडेल, त्यातच ते समाधानी असतात. उदरनिर्वाहाचे दुसरे साधन नसल्यामुळे आलेल्या प्रेताचे दहन करून त्यावरच मसनजोगी समाज उदरनिर्वाह करतो. शासन दरबारी अनेक वेळा विनंती-अर्ज केले, परंतु अजूनही मसनजोगी समाजाकडे शासनाने लक्ष दिले नाही, अशी तक्रारही मसनजोगी समाजाची आहे.

मराठी महिन्याप्रमाणे गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी प्रत्येकाच्या घरात गोडधोड करून गुढी उभारण्याची अनेक वर्षाची प्रथा आहे, परंतु गरिबी ही पाचविला पुजली आहे. त्यामुळे दरवर्षी आम्हा मसनजोगी समाजाला स्मशानतच गुढी उभारावी लागते, अशी कैफियतही या समाजाने मांडली. आमची आज चौथी पिढी आहे. आजही पडक्या आणि पत्राच्या शेडमध्ये राहून घरसंसार चालवावा लागतो.

कोरोनाची भीती आहे, पण सर्वकाही पोटासाठी

कोरोनाची भीती कोणाला नाही. भीती तर सर्वांनाच आहे. अहो, आश्चर्यच म्हणावे लागेेल, ते म्हणजे आमची लेकरंबाळं तर प्रेत जळत असते, त्यावेळेस तिथेच ती खेळत असतात. त्यांना कुठेही खेळण्यासाठी जागा नाही. लेकरांना किती थोपविले, तरी लेकरे जवळून जातात, पण ‘ देवाच्या कृपेने’ अजून तरी त्यांना काही झाले नाही. आज आमची चौथी पिढी आहे. शासनाने आमचा विचार केला नाही. याचे आम्हाला काही वाईट वाटत नाही. निदान आमच्या लेकराबाळांसाठी मसनजोगी समाजाला इतरत्र घरे बांधून द्यावीत, जेणेकरून पुढची पिढी तरी सुधारेल, अशी आर्त विनंतीही मसनजोगी समाजाने शासनाकडे केली आहे.

- सुरेश शेषराव इरेवाड, हिंगोली

फोटो नंबर ५