लग्न लावणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:30 IST2021-05-09T04:30:46+5:302021-05-09T04:30:46+5:30

हिंगोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून लग्न लावून दिल्याप्रकरणी वर-वधूच्या आई-वडिलांसह ३० ते ४० जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा ...

Getting married was expensive | लग्न लावणे पडले महागात

लग्न लावणे पडले महागात

हिंगोली : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून लग्न लावून दिल्याप्रकरणी वर-वधूच्या आई-वडिलांसह ३० ते ४० जणांवर सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे ८ मे रोजी करण्यात आली.

सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे ८ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून लग्न सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासन व महसूलच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोलीस निरीक्षक कृष्णा पाटील, पोलीस उपनिरीक्षक माकणे, पो.ह. शेषराव राठोड, कोरडे, बांगर, चिंचाळे, तलाठी आदी पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तलाठी गौस खान फिरोज खान पठाण आदींचे पथक हत्ता नाईक येथे पोहोचले. यावेळी लग्न सोहळ्यात ३० ते ४० वऱ्हाडी मंडळी असल्याचे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे पथकाला दिसले. याप्रकरणी तलाठी गौस खान फिरोज खान पठाण यांच्या फिर्यादीवरून बाजीराव बालाप्रसाद गडदे, सविता बाजीराव गडदे, नामदेवराव पंडितराव शिंदे, राहुल शिंदे, आनंदराव भगवान गडदे, गणेश रामजी काचगुंडे, सुभानराव नागोराव देवकते (रा. सेंदूरसना), आंबादास भागोराव गडदे, अशोक गणपत काचगुंडे, बाळू रामजी देवकते, विलास बालाप्रसाद गडदे, बालाप्रसाद बाजीराव गडदे, अनिल अरुण चक्के, शेख युनूस शेख महेबूब, सचिन शरद कुलकर्णी यांच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध (सर्व रा. हत्ता नाईक) सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोना. शेषराव राठोड करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पो.नि. कृष्णा पाटील, उपनिरीक्षक माकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Web Title: Getting married was expensive