सेनगाव (जि. हिंगोली): तालुक्यातील लिंबाळा तांडा शिवारात शुक्रवारी रात्री गुन्हेगारांच्या एका टोळीने हैदोस घालत प्रवाशांची लूटमार केली. जिंतूर तालुक्यातील अंबरवाडी येथील अशोक घुगे हे नातेवाईकाच्या लग्नासाठी साखरा येथे जीपने जात असताना, गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात घुगे यांच्या गळ्यातील तब्बल ६ तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने तोडून घेण्यात आली.
रॉड आणि काठ्यांनी वाहनावर हल्लामिळालेल्या माहितीनुसार, जीप चालकाने पाणी पिण्यासाठी वाहन थांबवले असता १० ते १२ जणांच्या टोळीने अचानक हल्ला केला. लोखंडी रॉड आणि काठ्यांनी वाहनावर प्रहार केल्यामुळे गाडीच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. आरोपींनी घुगे यांना ओढत बाहेर काढून बेदम मारहाण केली आणि याच गोंधळात शंकर नवले याने सोन्याची चैन ओरबाडली. इतक्यावरच न थांबता, या टोळीने सेनगावच्या दिशेने येणारा वाळूचा टिप्परही फोडला आणि चालकाला मारहाण करून मोठी रक्कम लुटली.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलया भीषण अनुभवानंतर घाबरलेल्या अशोक घुगे यांनी लिंबाळा येथील मित्राकडे आश्रय घेतला आणि त्यानंतर सेनगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी शंकर नवले, दामू नवले (रा. सावंगा म्हाळसा) आणि इतर १२ जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. रात्रीच्या वेळी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
Web Summary : A gang terrorized Sengaon, Hingoli, robbing passengers. Ashok Ghuge was attacked, his gold chain stolen. The gang also vandalized vehicles and assaulted drivers. Police have filed a case against multiple suspects, raising concerns about highway safety.
Web Summary : हिंगोली के सेनगाँव में यात्रियों को एक गिरोह ने आतंकित किया। अशोक घुगे पर हमला कर सोने की चेन छीन ली गई। गिरोह ने वाहनों में तोड़फोड़ की और चालकों पर हमला किया। पुलिस ने कई संदिग्धों के खिलाफ मामला दर्ज किया, राजमार्ग सुरक्षा पर चिंता जताई।