शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

टाळेबंदी लागली तर मोलकरणींसाठी अनेक घरांचे दरवाजे बंद होण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

हिंगोली : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता अनेक घरी मोलकरणींची सेवा बंद केली जात आहे, तर काही ठिकाणी मात्र ...

हिंगोली : कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता अनेक घरी मोलकरणींची सेवा बंद केली जात आहे, तर काही ठिकाणी मात्र योग्य काळजी घेत मोलकरणी सेवा देत आहेत. पुन्हा टाळेबंदी लागली तर मात्र गेल्यावर्षीसारखी उपासमार सोसण्याची वेळ येण्याची भीती अनेक मोलकरणींना वाटत आहे.

हिंगोली शहरात हजार ते बाराशे माेलकरणी घरोघर जाऊन धुणी, भांडी, झाडू-पोचा आदी कामे करतात. दैनंदिन कामाच्या व्यापात अथवा मोठ्या घरी कामाचा जास्त व्याप लक्षात घेता मोलकरणींचे महत्त्व जास्त आहे. मात्र कोरोनाच्या काळात भीतीने गेल्यावर्षी टाळेबंदी लागताच सर्वांत आधी या मोलकरणींवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. अनेक घरांचे काम करूनही जेमतेम रक्कम हाती पडणाऱ्या या मोलकरणींच्या हातचे काम गेल्याने अनेकींना उपासमारीचे संकट झेलावे लागले. त्यातच काहींनी इतर कामे करून कुटुंबाचा गाडा हाकला. मध्यंतरी कोरोनाची लाट ओसरल्यानंतर पुन्हा हाताला काम लागले होते. मात्र आता पुन्हा दुसऱ्या लाटेत काही जणांनी भीतीपोटी मोलकरणी बंद केल्या. तरीही अनेक घरी मात्र अजूनही मोलकरणी काम करीत आहेत. जर पुन्हा टाळेबंदी लागली तर नेमकी बसत असलेली आर्थिक घडी पुन्हा विस्कटण्याची चिंता या मोलकरणींना सतावत आहे.

तर हाता-तोंडाची गाठ मुश्कील

या काळात बाहेर पडणेही अवघड असते. घराच्या नजीकची कामे तेवढी जीव धोक्यात घालून बाहेर पडून करता येतील. मात्र इतरांचे काय? ही सर्व कामे केली नाही तर हाता-तोंडाची गाठ पडणे मुश्कील आहे.

एका घरातून पाचशे ते हजार

सध्या एखाद्या घरी भांडी तर एखाद्या घरी धुणी असे काम मिळते. क्वचितप्रसंगी एकाच घरात धुणी व भांडी असे काम मिळते. त्यामुळे धुणी, भांडी, झाडू व पोचा या प्रत्येक कामास प्रत्येकी सहाशे रुपये मिळतात, तर घरातील सदस्यसंख्या जास्त असेल, खोल्यांची संख्या जास्त असेल तर सातशे ते आठशेपर्यंत मिळतात.

सहा तोंडांचे पोट कसे भरणार?

माझ्या कुटुंबात सहा जण आहेत. पतीची घरासाठी फारशी मदत होत नाही. मुले लहान आहेत. इतर सदस्य ज्येष्ठ आहेत. कधीतरी त्यांच्या कामाची रक्कम मिळते. दहा ते बारा घरचे काम करून सात हजार पदरी पडतात. तेही मिळणार नसतील तर पोट कसे भरायचे?

- कल्पना राऊत

पतीला मदत म्हणून काही घरांचे घरकाम करून संसाराला हातभार लावते. सध्या कोरोनामुळे पतीच्या हातालाही फारसे काम लागत नाही. त्यामुळे मुलांसह सहा जणांच्या कुटुंबाचा गाडा हाकताना दमछाक होत आहे. अनेक घरात रुग्ण आढळतात. अशा घरचे काम बंद होते.

- शेख अफसाना

मागील अनेक वर्षांपासून काम करीत आहे. मुले कामाच्या शोधात बाहेर गेली. तीन ते चार जण येथे राहातो. कोरोनामुळे मागील वर्षभरात पहिल्यांदाच अनेकदा कामावर जाता आले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी येत आहे. पुन्हा टाळेबंदी लागली तर खूप अवघड आहे.

- शांताबाई इंगळे

शहरातील मोलकरणींची साधारण संख्या ११५०

शहरातील मोलकरणींच्या हाताला मिळेना काम ३००