शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

मोफत शाळा प्रवेशासाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:26 IST

हिंगोली : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी आतापर्यंत ७३२ ऑनलाइन अर्ज आले आहेत. ...

हिंगोली : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत देण्यात येणाऱ्या मोफत प्रवेशासाठी आतापर्यंत ७३२ ऑनलाइन अर्ज आले आहेत. अर्ज भरण्यास ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे.

दुर्बल व वंचित घटकातील मुलांना नामांकित खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळावा, यासाठी अशा शाळांत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार, या जागांवर मोफत प्रवेश देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ३ मार्चपासून अर्ज सादर करण्यास सुरुवात झाली आहे. अगोदर २१ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदत दिली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीमुळे अनेक ठिकाणचे ऑनलाइन सेंटर काही वेळापुरतेच उघडे राहत आहे. या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करताना पालकांनाही कसरत करावी लागत होती. त्यात अर्ज भरण्याची मुदत संपत आली होती, शिवाय काही दिवस ओटीपीचा अडथळाही निर्माण झाला होता. यातून अनेक पालकांचे मोफत प्रवेशासाठीचे ऑनलाइन अर्ज भरण्याचे राहून गेले होते. आता पुन्हा ३० मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ मिळाली आहे. मुदतवाढ मिळाल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.

२१ मार्चपर्यंत ७३२ अर्ज

जिल्ह्यातील ७९ खासगी शाळांमध्ये ५३० जागा दुर्बल व वंचित घटकातील मुलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. २१ मार्चपर्यंत ५३० जागांसाठी ७३२ ऑनलाइन अर्ज आले होते. मुदतवाढ मिळाल्याने यात आणखी भर पडणार आहे. दरम्यान, राज्यातील ९ हजार ४३२ शाळांमधील ९६ हजार ६८१ जागांसाठी १ लाख ८३ हजार ५९५ ऑनलाइन अर्ज आले होते.