अध्ययनस्तर निश्चितीत जिल्ह्याला ५१ टक्के गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 12:52 AM2019-08-28T00:52:57+5:302019-08-28T00:53:35+5:30

जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळेत ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान शाळा स्तरावर पहिली अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्याची गुणवत्ता ५१.३५ टक्के असल्याचे आढळून आले.

 District level 3% marks in determining study level | अध्ययनस्तर निश्चितीत जिल्ह्याला ५१ टक्के गुण

अध्ययनस्तर निश्चितीत जिल्ह्याला ५१ टक्के गुण

Next

इलियास शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : जिल्ह्यातील जि.प.च्या सर्व शाळेत ५ ते ८ आॅगस्ट दरम्यान शाळा स्तरावर पहिली अध्ययनस्तर निश्चिती चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जिल्ह्याची गुणवत्ता ५१.३५ टक्के असल्याचे आढळून आले.
जिल्ह्यातील दुसरी ते आठवीची भाषा, गणित, इंग्रजी या तीन विषयांची अध्ययनस्तर निश्चिती झाली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी, विद्यार्थी झपाट्याने प्रगत व्हावेत, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा स्तर निश्चित व्हावा, त्यांना भाषा विषयाचे लेखन, वाचन, गणितातील मूलभूत क्रिया याव्यात, यासाठी अध्ययनस्तर निश्चिती करण्यात आली. आता अध्ययन निष्पत्तीवर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात एकूण दुसरी ते आठवीचे ७५ हजार १३४ विद्यार्थी आहेत. भाषा विषयाची जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता ६४.२६ टक्के, गणिताची ५४.०३ टक्के, इंग्रजीची ३५.७५ टक्के गुणवत्ता आली आहे. वसमत तालुक्याची सरासरी गुणवत्ता ५३.८७ टक्के, कळमनुरी तालुक्याची ५३.४८ टक्के, हिंगोली तालुका ५१.१२, औंढा ५०.५४ तर सेनगाव तालुक्याची सरासरी गुणवत्ता ४७.३८ टक्के आहे. विद्यार्थी कोणत्या विषयात मागे आहेत. कोणते घटक विद्यार्थ्यांना समजत नाहीत. याचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
शाळा १०० टक्के प्रगत व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने अध्ययन निष्पत्तीवर भर देण्याचे ठरविले आहे. ही पहिली अध्ययनस्तर निश्चिती शाळेतील शिक्षकांकडून करून घेण्यात आलेली आहे. जिल्ह्यात जि.प.च्या ८८२ शाळा आहेत. या शाळेतील अध्यापन पद्धती विद्यार्थी अप्रगची कारणे, गुणवत्तेत विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत. याचीही चाचपणी शिक्षण विभाग करणार आहे. ‘मुल भेट शाळेवर थेट’ या उपक्रमावरही शिक्षण विभाग भर देत आहे. कमी गुणवत्ता आलेल्या शाळेतील शिक्षकांना गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी समज दिला जाणार आहे. यानंतरही गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे उपशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी सांगितले. शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना वाचन, लेखण, गणितातील मुलभूत क्रिया आल्या पाहिजेत, यासाठी शिक्षण विभाग धडपड करीत आहेत. शिक्षकाचे अध्यापन दर्जेदार व्हावे, शिकविताना कोणत्या अध्यापन पद्धती वापराव्यात, विद्यार्थी प्रगत कसे करावे, याबाबत दर महिन्याला शिक्षण परिषदा घेवून शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यात आली. या चाचणीनंतर अध्ययनस्तर निश्चितीवर भर दिल्या जाणार आहे. आता सर्व शिक्षकांना अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करावे लागणार आहे.
विद्यार्थी प्रगत करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. कोणत्या घटकात विद्यार्थी अप्रगत आहे. हे पाहून विद्यार्थी दोन महिन्यांत प्रगत करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दोन महिन्यात सर्व विद्यार्थी शंभर टक्के प्रगत करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- राजेश पातळे
उपशिक्षणाधिकारी हिंगोली

Web Title:  District level 3% marks in determining study level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.