डिग्रस बु. येथील तिघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:21+5:302021-01-02T04:25:21+5:30

कळमनुरी तालुक्यातील डिग्रस येथील जनाबाई रामजी बोडखे, धर्मराज रामजी बोडखे व त्यांची पत्नी यांनी २१ डिसेंबर राेजी तिघांनी संगनमत ...

Digras Bu. Atrocity charges filed against three here | डिग्रस बु. येथील तिघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

डिग्रस बु. येथील तिघांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

कळमनुरी तालुक्यातील डिग्रस येथील जनाबाई रामजी बोडखे, धर्मराज रामजी बोडखे व त्यांची पत्नी यांनी २१ डिसेंबर राेजी तिघांनी संगनमत करून येथील साहेबराव वामन लोंढे यांच्या घराचे असलेले शौचालय, स्नानगृह जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकले. माझे शौचालय, स्नानगृह का पाडले, असे लोंढे यांनी विचारले असता, तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जातीवाचक व अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी दिनांक ३१ डिसेंबर रोजी साहेबराव वामन लोंढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जनाबाई रामजी बोडखे, धर्मराज रामजी बोडखे व त्यांची पत्नी या तिघांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वसमत प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी वसीम हाश्मी हे करीत आहेत.

Web Title: Digras Bu. Atrocity charges filed against three here