एकादशीनिमित्त भाविकांनी घेतले संत नामदेवाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:36 IST2021-07-07T04:36:28+5:302021-07-07T04:36:28+5:30

श्रीक्षेत्र असलेल्या नर्सी या ठिकाणी सोमवारी योगिनी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नामदेवांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. एकादशीनिमित्त श्री संत ...

Devotees pay obeisance to Saint Namdeo on the occasion of Ekadashi | एकादशीनिमित्त भाविकांनी घेतले संत नामदेवाचे दर्शन

एकादशीनिमित्त भाविकांनी घेतले संत नामदेवाचे दर्शन

श्रीक्षेत्र असलेल्या नर्सी या ठिकाणी सोमवारी योगिनी एकादशीनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी नामदेवांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. एकादशीनिमित्त श्री संत नामदेव महाराज यांच्या वस्त्र समाधीची सकाळी महापूजा, आरती करण्यात आली.

संत नामदेव महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरामध्ये रांगेत उभे राहून दर्शन घेतले. तसेच मंदिरासमोर शिवनंदा वाबळे रा. उमरा (वाबळे) त्यांनी संताच्या भारुडातून समाज प्रबोधन केले.

यावेळी नर्सीसह परिसरातील पहेणी, सवड, केसापूर, कडती, गिलोरी, वैजापूर, हनवतखेडा, देऊळगाव, नांदुरा, सरकळी, वरुड काजी, उमरा, ब्रह्मपुरी, काळकोंडी, घोटादेवी आदी ठिकाणांवरून भाविकांनी हजेरी लावली होती. एकादशीनिमित्त मंदिर परिसरामध्ये कोरोना नियमांचे पालन करीत बेलफूल, मिठाई भांडार, फळविक्रेते, कटलरीचे दुकान, कुंकू भांडार, देवी-देवतांची फोटो विक्रेते आदी प्रतिष्ठाने थाटण्यात आली होती.

फोटो १२

Web Title: Devotees pay obeisance to Saint Namdeo on the occasion of Ekadashi