सात कोरोना रुग्णांचा मृत्यू; २२८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:30 IST2021-04-24T04:30:07+5:302021-04-24T04:30:07+5:30

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ११२४५ रुग्ण आढळून आले. यापैकी ९६१८ जण बरे झाल्याने घरी सोडले, तर १४४५ जणांवर सध्या ...

Death of seven corona patients; 228 new patients | सात कोरोना रुग्णांचा मृत्यू; २२८ नवे रुग्ण

सात कोरोना रुग्णांचा मृत्यू; २२८ नवे रुग्ण

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ११२४५ रुग्ण आढळून आले. यापैकी ९६१८ जण बरे झाल्याने घरी सोडले, तर १४४५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यापैकी ४२० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे, तर अतिगंभीर असलेल्या ४८ जणांना बायपॅपवर ठेवण्यात आले आहे. एकूण ४६८ जणांची प्रकृती गंभीर आहे.

सात जणांचा मृत्यू

शुक्रवारी हिंगोलीच्या आयसोलेशन वाॅर्डात दाखल कळमनुरी तालुक्यातील इसापूर येथील ६४ वर्षीय पुरुष व सुराणानगर येथील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. नवीन कोविड हॉस्पिटल बसस्थानकासमोर येथे शिरडशहापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, औंढा येथील ७५ वर्षीय महिला, रामाकृष्णानगर हिंगोलीची ७२ वर्षीय महिला, जेडपरळी, परभणी येथील ६२ वर्षीय पुरुष या चौघांचा मृत्यू झाला, तर वसमत येथील रुग्णालयात गिरगाव येथील ५५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

Web Title: Death of seven corona patients; 228 new patients