शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

उकीरडा साफ करण्याची मागणी फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगावाच्या प्रवेश रस्त्यावरच मोठा उकिरडा निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून ...

उकीरडा साफ करण्याची मागणी

फाळेगाव : हिंगोली तालुक्यातील फाळेगावाच्या प्रवेश रस्त्यावरच मोठा उकिरडा निर्माण झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून नागरिक घरातील व इतर कचरा रस्त्याकाठी टाकत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी उकिरडा झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून कचरा साचला असल्यामुळे त्याची दुर्गंधीही पसरत आहे. याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. उकिरडा साफ करण्यात यावा, अशी मागणी गावकरी करीत आहेत.

‘रोहयो’ अंतर्गत कामे सुरू करावीत

औंढा नागनाथ : ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गतचे कामे चालू नाहीत. कामाच्या शोधात काही मजूर पर जिल्ह्यात जात आहेत. कोरोनामुळे अनेक मजुरांचे आर्थिक गणित कोलमडले असल्यामुळे गावात कामे नाहीत. यामुळे मजूरवर्ग कामाच्या शोधात परगावी जात आहे. यासाठी गावात रोहयोचे कामे सुरू करावीत, अशी मागणी मजूरवर्ग करीत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित

हिंगोली : शहरातील जिजामातानगर, आंबेडकरनगर, सावरकरनगर, सरस्वतीनगर, कमलानगर आदी ठिकाणचा वीजपुरवठा मागील चार दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. या प्रकारामुळे अनेक नागरिकांच्या घरातील वीज उपकरणे जळून जात आहेत. यासाठी महावितरण कंपनीने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.

बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

हिंगोली : शहरातील कपडा गल्ली, हरण चौक, गड्डेपीर गल्ली आदी ठिकाणी छोटे रस्ते आहेत. या रस्त्याकाठी अनेक दुकानेही आहेत.दुकानात येणारे ग्राहक आपले वाहन रस्त्याच्या बाजूला न लावता, रस्त्याच्या मध्ये लावत असल्यामुळे या रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी व पादचाऱ्यांना वाहतुकीसाठी मोठा अडथळा होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे वादही होत आहेत.

माेकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास

हिंगोली : शास्त्रीनगर, आदर्श महाविद्यालय परिसर, सरस्वतीनगर या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास मोकाट कुत्रे टोळक्याने बसत आहेत. जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांच्या मागे लागत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. तेव्हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

शहरात मुख्य ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे

हिंगोली : शहरातील गांधी चौक, अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर, भाजी मंडई आदी वर्दळीची ठिकाणे आहेत. या ठिकाणी कचरा साचलेला पाहावयास मिळत आहे. कचऱ्यात प्लास्टीक वस्तुंचा समावेश असून, शहरातील मोकाट जनावरांच्या पोटात ते जात आहे. नगरपालिकेने कचऱ्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

पाणीपोई उभारण्याची मागणी

कळमनुरी : शहर व परिसरात चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. यामुळे कामानिमित्त बाहेर निघणाऱ्या नागरिकांना तहान लागत आहे. उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी शहरात पाणीपोई उभारण्यात याव्यात, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

बाजारपेठेत टरबुजाची आवक वाढली

हिंगोली : उन्हाळ्याची सुरुवात झाली असून, शहरात अनेक ठिकाणी शीतपेयांसह रसवंत्या वाढल्या आहेत, तसेच उन्हाळ्यात नागरिकांची मोठी मागणी असणाऱ्या टरबूज पिकाचीही आवक वाढली आहे. सध्या अनेक फळविक्रेत्यांकडे टरबूज विक्रीसाठी आलेले असून, यास मोठी मागणी आहे.

पाेलीस गस्तीची मागणी

हिंगोली : शहरातील अष्टविनायक नगर ते रेल्वे स्थानक रस्त्यावर रात्रीच्या वेळी टवाळखोर आपल्या दुचाकीचा मोठ्याने आवाज करीत आहेत. याचा त्रास परिसरातील नागिरकांना होत आहे. विनाकारण हॉर्न मोठा करून भरधाव वेगाने वाहने चालविली जात आहेत. तेव्हा पोलिसांनी रस्त्यावर गस्त सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.