शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेचे संकट; लहान मुलांचा तापही अंगावर काढू नका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:27 IST

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे आधीच सांगितले आहे. यात लसीकरणामुळे काही वर्ग सुरक्षित झाला आहे. तर काही ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे आधीच सांगितले आहे. यात लसीकरणामुळे काही वर्ग सुरक्षित झाला आहे. तर काही जणांना कोरोना होऊन गेला आहे. शिवाय कोरोनासदृश लक्षणे असल्यास मोठ्यांची कोरोना चाचणी होते. मात्र लहान मुलांच्या चाचणीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे त्यांना ताप, सर्दी असल्यास अंगावर न काढता कोरोनाचीही चाचणी करून घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण १५९९५

१५ वर्षांखालील रुग्ण ११३८

सर्दी, खोकला व तापाची साथ

हिंगोली जिल्ह्यात सध्या कोरोनाचे प्रमाण कमी असले तरीही रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळत आहेत. त्यातच लहान मुलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. त्यातही ताप व डोकेदुखी ही दोन लक्षणे जास्त दिसत आहेत.

ताप आला म्हणजे कोरोना असे नाही पण...

प्रत्येक ताप हा कोरोनाच असतो असे नाही. इतर विषाणूजन्य आजारांतही तापाचीच लक्षणे आढळतात. मात्र कोरोनाची चाचणी केल्यास इतर निदान करणे सोपे जाते.

सध्या ताप, डोकेदुखी, उलटी, जुलाब अशी लक्षणे आढळत असून अनेकांना प्लेटलेटस् कमी झाल्याचे आढळत आहे. काही लक्षणे कोरोनाची दिसत आहेत.

लहान मुलांना आता पूर्वीपेक्षा जास्त बाहेर सोडले जात असल्याने कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून तपासणे गरजेचे आहे.

बालकांसाठी कोविड केअर सेंटर

हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ५० खाटांची अतिदक्षता बालरुग्णालय उभारले आहे. शिवाय प्रत्येक तालुक्याला १० खाटांचे नियोजन केले आहे. मात्र रुग्णच नसल्याने हे नियोजन अजून प्रत्यक्षात उतरले नाही.

घाबरू नका, काळजी घ्या

सध्या लहान मुलांमध्ये ताप व सर्दीची लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे घाबरून न जाता आरटीपीसीआर चाचणी केली पाहिजे. त्यामुळे पुढील सदस्या उद्भवणार नाहीत.

-डॉ. गोपाल कदम, बालरोगतज्ज्ञ