सेनगावात झेंडा राेवण्याच्या कारणांवरून ९० जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:31 IST2021-02-24T04:31:49+5:302021-02-24T04:31:49+5:30

सेनगाव येथे २२ फेब्रुवारी राेजी जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता येथील तहसील कार्यालय समाेरील टी पाईंटवर गैरकायद्याची मंडळी ...

Crimes registered against 90 people for flag hoisting in Sengaon | सेनगावात झेंडा राेवण्याच्या कारणांवरून ९० जणांवर गुन्हे दाखल

सेनगावात झेंडा राेवण्याच्या कारणांवरून ९० जणांवर गुन्हे दाखल

सेनगाव येथे २२ फेब्रुवारी राेजी जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता येथील तहसील कार्यालय समाेरील टी पाईंटवर गैरकायद्याची मंडळी जमवून रस्ता अडवून बेकायदेशीररित्या झेंडा राेवण्यासाठी चिथावणी दिली. तसेच केंद्रीय महामार्ग ४६१ बी या सार्वजनिक रस्त्याच्या कडेला खड्डा खोदून रस्त्याची नासधूस करीत झेंडा रोवला. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले.

याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनेकांवर गुन्ह्यांची नाेंद करण्यात आली आहे. यामध्ये आराेपी किरण घोंगडे, अशोक इंगळे, विनोद ज्ञानबा खंदारे, दिलीप लाटे, समाधान लक्ष्मण खंदारे, अभिजीत खंदारे, विष्णू खंदारे, राहुल वाघमारे, ओमप्रकाश प्रल्हाद देशमुख, वसंत राजाराम पडघन, विशाल भिमराव खरात, गजानन प्रकाश वाघमारे, राजू कचरू ठोके, संजय दिलीप वाघमारे, अमोल भगवान ठोके, विनोद गाेविंदा वाघमारे, संजय दिलीप वाघमारे, रवी उत्तम गवळी, अशाेक आश्राेबा वाकळे, अर्जुन गवळी, वसंता वैराट , संदीप देवबा सुतार, मंगेश गवळी, आविनाश वाघमारे, विजय गवळी, प्रकाश वाघमारे, अनिल तनसे, बाळू वाघमारे, उषा गणपत लाेणकर, ज्याेती राेहिदास गायकवाड, नम्रता कैलास माेरे, आनंदा लक्ष्मण खंदारे यांच्यासह ९० जण रा. सेनगाव, तळणी, साखरा येथील अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पाेलीस अधीक्षक यतीश देशमुख, पाेनि पाटील यांच्यासह पाेलिसांनी पाहणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास सपाेनि लाेकडे करीत आहेत.

Web Title: Crimes registered against 90 people for flag hoisting in Sengaon