CoronaVirus : कोरोना नाही तर सारी आजाराने झाला त्या व्यक्तीचा मृत्यू; इतर दोघेही निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 02:47 PM2020-04-23T14:47:29+5:302020-04-23T14:48:04+5:30

थ्रॉट स्वॅब अहवाल आला निगेटीव्ह

CoronaVirus: A person who died of sari disease, not corona; The other two are also negative | CoronaVirus : कोरोना नाही तर सारी आजाराने झाला त्या व्यक्तीचा मृत्यू; इतर दोघेही निगेटिव्ह

CoronaVirus : कोरोना नाही तर सारी आजाराने झाला त्या व्यक्तीचा मृत्यू; इतर दोघेही निगेटिव्ह

Next

हिंगोली : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात २१ एप्रिल रोजी भरती करण्यात आलेल्या ३० वर्षीय व्यक्तीचा सारी या आजाराने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरील व्यक्ती हा मुंबई येथे कामाला होता. त्या व्यक्तीचा व त्याच्या जवळच्या संपर्कातील दोन नातेवाईकांचे असे एकूण तिघांचे थ्रॉट स्वॅब नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते.

 या तिघांच्याही नमुन्याचा तपासणी अहवाल हा ‘निगेटीव्ह’ आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वार्डात राज्य राखीव दलाचे सहा पॉझीटीव्ह जवानांना भरती करण्यात आले असून या सर्वांची प्रकृती स्थिर आहेत, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे गंभीर लक्षणे नाहीत. या ६ जवानांपैकी ५ जवान हे मालेगाव (नाशिक) येथून व एक जवान मुंबई येथून आलेला आहे.

Web Title: CoronaVirus: A person who died of sari disease, not corona; The other two are also negative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.