कोरोनाचे नवे ४८ रुग्ण; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST2021-03-20T04:28:16+5:302021-03-20T04:28:16+5:30

आज हिंगोली शहरातील नाईक नगर भागातील एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही महिला जिल्हा ...

Corona's 48 new patients; Death of one | कोरोनाचे नवे ४८ रुग्ण; एकाचा मृत्यू

कोरोनाचे नवे ४८ रुग्ण; एकाचा मृत्यू

आज हिंगोली शहरातील नाईक नगर भागातील एका ६९ वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही महिला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डात दाखल होती. आजपर्यंत ७२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंत कोरोनाचे ५१०९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ४६०५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या ४३२ जणांवर विविध कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या दाखल असलेल्या रुग्णांपैकी ३५ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर ५ जणांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सामाजिक अंतर, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून या आजारापासून बचावाचे आवाहन केले आहे.

Web Title: Corona's 48 new patients; Death of one