शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना वाढला; सॅनिटायझरचा वापर मात्र घटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी सॅनिटायझरचा वापर मात्र म्हणावा तसा होताना दिसून ...

हिंगोली : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले असले तरी सॅनिटायझरचा वापर मात्र म्हणावा तसा होताना दिसून येत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के घट सॅनिटायझर वापरण्यात झाल्याचे दिसून येत आहे.

मार्च २०२० मध्ये कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला होता. त्यावेळेस ९० टक्के सॅनिटायझर वापरल्या जात होते. जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यात तर ते प्रमाण ७० टक्क्यांवर येऊन पोहोचले होते. सद्यस्थितीत ५० टक्के घट सॅनिटायझरमध्ये झाल्याचे पहायला मिळत आहे. जिल्ह्यात मागील दीड महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण दिवसागणिक आढळून येत असले तरी सॅनिटायझर मात्र म्हणावे तसे कोणीही विकत घेऊन जात नाही. सॅनिटायझरने हाताला खाज येते, अशा तक्रारी काही ग्राहकांच्या असल्या तरी त्याला काही अर्थ नाही, असे मेडिकल दुकानदारांचे म्हणणे आहे. एकंदर सॅनिटायझरमध्ये ५० टक्के तर मास्क विक्री ३५ टक्के घट झाल्याचे पहायला मिळत आहे.

मागील वर्षाची विक्री ९० टक्के

यावर्षही सॅनिटायझर विक्री ५०

मास्क विक्रीत ३५ टक्के घट

बाॅक्स

५० टक्के विक्री झाली

१) कोरोना वाढला तरी सॅनिटायझर विक्री म्हणावी तशी होत नाही. मास्क अनेक जण विकत घेत आहेत. पण सॅनिटायझर नंतर घेऊन जाऊ असे ग्राहक म्हणत आहेत.

२) आरोग्य विभागाने सॅनिटायझरचा वापर करा, विनामास्क फिरु नका, अशा सूचना दिल्यानंतरही काही जण सॅनिटायझरपेक्षा मास्कच घेऊन जात आहेत.

३) मास्क घातल्यानंतर धूळ तोंडात जात नाही, मातीचे कण नाकात जात नाहीत, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहक मास्कला पसंती देत आहेत.

४) अनेक कंपनीचे सॅनिटाझर बाजारात आले आहेत. कोणते सॅनिटायझर वापरावेत? कोणते नाही? या द्विधा मनस्थितीत ग्राहक आढळून येत आहेत, त्यामुळे विक्रीत घट झाली आहे.

सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया कोरोना वाढला असल्याने थोडी भीती निर्माण झाली आहे. सॅनिटायझर संपले की मी साबणाने हात धुतो . बाहेरगावी जातेवेळेस गाडी स्वच्छ धुवून प्रवाशांना सॅनिटायझरचा वापर करायला लावतो.

-गणेश माखणे, हिंगोली

कोरोना वाढला असला तरी सॅनिटायझरचा वापर काही प्रमाणात कमीच केला आहे. साबणाने आणि गरम पाण्याने हात धुत आहे. बाहेर जाताना मात्र विना मास्क जात नाही.

-मुरली कल्याणकर, हिंगोली