शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयात कोविड रुग्णांचे हाल ; बाहेर नातेवाईक बेहाल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

हिंगोली : कोरोनाबाधित रुग्णांना येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. मात्र, रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून ...

हिंगोली : कोरोनाबाधित रुग्णांना येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले जात आहे. मात्र, रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून बाहेर थांबलेल्या नातेवाइकांचीही गैरसोय होत आहे. कोरोनामुळे शहरातील नातेवाइकांकडेही थांबता येत नसल्याने उघड्यावर रात्र काढावी लागत असल्याचे चित्र आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची डॉक्टर काळजी घेत असले तरी रुग्णसंख्या वाढत चालली आहे. रुग्णांच्या तुलनेत डॉक्टरांची संख्याही अपुरी असल्याने रुग्णांची देखभाल करताना डॉक्टर, नर्सची धावपळ होत आहे. वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत असल्या तरी अनेक रुग्णांचे नातेवाईक जेवणाचा डब्बा, पाणी बॉटल देण्याचा प्रयत्न करीत आहेत. रुग्णाला काही लागल्यास कोणीतरी नातेवाईक जवळ असावा, या उद्देशाने एकादा तरी नातेवाईक रुग्णासोबत येत आहे. मात्र, कोविड सेंटरमध्ये थांबण्यास नातेवाइकांना परवानगी नसल्याने नातेवाइकांना रुग्णालयाच्या बाहेरच थांबावे लागत आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात संचारबंदी असल्याने अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांशिवाय इतर कोणतीही दुकाने सुरू नाहीत. त्यात हॉटेल बंद असल्याने नातेवाइकांची जेवणावाचून हाल होत आहेत. घरून आणलेली भाकर रात्रीही खाल्ली जात आहे. त्यात उघड्यावर झोपावे लागत असल्याचा आराेपही नातेवाईक करीत आहेत.

नातेवाइकांच्या प्रतिक्रिया...

कोरोनाबाधित रुग्णासोबत आलो आहे. मात्र, कोविड सेंटरमध्ये नातेवाइकांना थांबू दिले जात नसल्याने रुग्णालयाबाहेर थांबावे लागत आहे. जवळ हॉटेलही सुरू नसल्याने रात्रीच्या जेवणाची पंचाईत होत आहे.

- संताेष सरनाईक

कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला आहे. आतमध्ये आरोग्य सुविधा वेळेवर मिळत असल्या तरी पिण्याचे पाणी, जेवणाचा डब्बा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्रीला उघड्यावरच थांबावे लागत आहे.

- गणेश साखरे,

हिंगोलीतील हॉटेल बंद असल्याने रात्रीच्या जेवणाची पंचाईत होत आहे. तसेच शहरात नातेवाईक आहेत. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या घरीही जाता येत नाही. तसेच लॉजही सुरू नसल्याने रात्रीला डासांचा त्रास सहन करावा लागत आहे.

- राजू इंगोले

-