शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

मिरची, मसाल्यांना महागाईचा ठसका तरीही खरेदीला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:28 IST

हिंगोली : उन्हाळ्याची चाहूल लागली असून गृहिणी चटणी, मसाला बनविण्यात व्यस्त झाल्या आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मसाल्याचे ...

हिंगोली : उन्हाळ्याची चाहूल लागली असून गृहिणी चटणी, मसाला बनविण्यात व्यस्त झाल्या आहेत. या संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी मसाल्याचे पदार्थ, लाल मिरचीच्या दरातही किंचित वाढ केली आहे. मात्र, एकदा मसाला, चटणी बनिवली असता वर्षभराची चिंता मिटत असल्याने लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदीला पसंती दिली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील उन्हाळ्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. बाजारपेठ बंद असल्याने मिरची व मसाल्याचे पदार्थ फारसे खरेदी करता आले नाहीत. अनेकांनी तयार मसाले व चटणीला पसंती दिली होती. यावर्षीही कोरोना असला तरी सध्या बाजारपेठ काही वेळ सुरू राहत आहे. त्यामुळे अनेक महिला लाल मिरची व मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी सरसावल्या आहेत. गतवर्षीपेक्षा लाल मिरची व मसाले पदार्थ्यांच्या किमतीत किंचित वाढ झाली आहे. तरीही अनेक गृहिणी मध्यम दर्जाच्या मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.

मिरची येते तेलंगणातून

जिल्ह्यात काही शेतकरी मिरचीची लागवड करीत असले तरी हिरव्या मिरच्या विक्रीलाच पसंती दिली जाते. क्वचित शेतकरी लाल मिरच्या विक्री करतात. त्यामुळे बाहेरील राज्यांतूनच लाल मिरची आयात करावी लागते. जिल्ह्यात गावरान मिरचीला मागणी असती तरी कमी किमतीच्या विविध मिरच्या विक्रीसाठी आल्या आहेत. सध्या तेलंगणा, गुंटूर, तिरुपती आदी ठिकाणाहून मिरची आयात केली जात असल्याचे मिरची विक्रेता शेख सत्तार यांनी सांगितले.

मिरचीचे दर (प्रति किलो)

गावरान - २००

तेजा - १५०

कुंटूर - १४०

ब्याडगी - १३५

मसाल्याचे दर (प्रति किलो)

धने - १२०

जिरे - १६०

तीळ - १२०

खसखस - ११००

खोबरं - २००

मेथी - ८०

हळद - १२०

मोहरी -१००

अन्य मसाले (प्रति दहा ग्रॅम)

लवंग - १०

बदामफुल - १०

बडीशेप - ३

नाकेश्वर - २०

धोंडफूल -७

वेलदोडे - ४०

जायपत्री -२५

त्रिफळ - २५

प्रतिक्रिया...

मागील उन्हाळ्यात कोरोनामुळे मसाला, चटणी करता आली नाही. आता उन्हाळा सुरू झाला असून मसाला, चटणी बनविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा लाल मिरची व मसाल्यांच्या पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने यावर्षी कमी मसाला बनविणार आहे.

-अनिता मोरे, अंभेरी

दरवर्षी मसाला, लाल चटणी घरीच तयार करून स्वयंपाकामध्ये वापरत असते. याही वर्षी चटणी व मसाला बनवीत आहे. मात्र, गतवर्षीपेक्षा मसाल्याच्या काही पदार्थ्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे मध्यम प्रतीच्या पदार्थांची खरेदी करून मसाला बनविला जात आहे.

-संगीता सुरोशे, चुडाळा