शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांमुळेच वाढतोय मुले, ज्येष्ठांमध्ये कोरोनाचा कहर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:26 IST

बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी घरात प्रवेश केल्यानंतर आधी आंघोळ करून घ्यावी. कपडे वेगळे साबणाच्या पाण्यात भिजवायला टाकावेत. ...

बाहेरून घरी आल्यानंतर ही घ्या काळजी

घरात प्रवेश केल्यानंतर आधी आंघोळ करून घ्यावी. कपडे वेगळे साबणाच्या पाण्यात भिजवायला टाकावेत. कुटुंबात थेट मिसळू नये. स्वतंत्र खोलीत राहावे.

घरात वावरतानाही सामाजिक अंतराचा नियम पाळावा. कुटुंबीयांमध्ये सहभागी होताना मास्कचा वापर करावा. वृद्ध व लहान मुलांपासून दूर राहावे.

जेवताना सहसा कुटुंबीयांसमवेत न जेवता वेगळी वेळ ठेवावी, जेणेकरून जेवताना कधी खोकला आला, ठसका लागला, तर इतरांना संसर्गाची भीती कमी राहील.

ही पाहा उदाहरणे

औंढा नागनाथ येथे एका बाहेर फिरणाऱ्या तरुणामुळे त्यांच्या मुलाला कोरोना झाला. या तरुणाला कोणतीच लक्षणे नव्हती. अचानक या मुलाला ताप आला. एका खासगी रुग्णालयात लहान मुलावर उपचार केले. तो लवकर बरा झाला. मात्र, हा मुलगा आजी व आजोबांच्या अंगावर असल्याने त्यांनाही कोरोना झाला. कधीच घराबाहेर न पडणारे हे दाम्पत्य बाधित झाल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला.

गिरगावात तर याची अनेक उदाहरणे सांगता येतील. या गावात बाहेर फिरणाऱ्या तरुणाईमुळे कधी घराबाहेरही न पडणाऱ्या अनेक वृद्धांना कोरोनाची बाधा झाली. हे लक्षात येण्यास विलंब झाला. परिणामी, अनेकांना ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ येत आहे. वृद्ध बाहेर फिरत नसले, तरीही तरुणांमुळे त्यांना लागण झाली.

सोळा वर्षांखालील पॉझिटिव्ह ९२५

६१ ते १०० वर्षे वयाचे पॉझिटिव्ह १२३६

एकूण पॉझिटिव्ह ६७१६

जिल्ह्यात काेरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. यामध्ये बाहेर फिरणाऱ्यांनी कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. अशांनी बाहेर असताना मास्क काढू नये. सामाजिक अंतर पाळावे, सॅनिटायझर वापरावे. घरी जाताच आंघोळ करावी. घरातही लहान मुले व वृद्धांपासून वेगळे राहावे. ठरावीक काळानंतर कोरोना तपासणी करूनच कुटुंबीयांसमवेत सहभागी व्हावे.

-डॉ.राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक