हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अन् अनेकजन नजरकैदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:41 PM2019-08-30T17:41:01+5:302019-08-30T17:42:42+5:30

जवळपास सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हिंगोली शहर ठाण्यात आणुन बसविले होते.

Chief Minister's visit to Hingoli and many others in detention | हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अन् अनेकजन नजरकैदेत

हिंगोलीत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा, अन् अनेकजन नजरकैदेत

Next
ठळक मुद्दे सकाळपासूनच अनेकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली

हिंगोली : मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस महाजनादेश यात्रेनिमित्त ३० आॅगस्ट रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले. पोलीस प्रशासनाकडूनही जागो-जागी चौका-चौकात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ होणार नाही, याची काळजी घेत अनेकांना पोलिसांनी सकाळपासूनच नजरकैदेत ठेवले होते.  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३० आॅगस्ट रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत पोलीस प्रशासनाकडून गंभीरतेने दखल घेण्यात आली. त्यामुळे सकाळपासूनच अनेकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ होणार नाही, याची खबरदारी घेत यापुर्वीच त्यांना नोटीसा बजावल्या होत्या. शुक्रवारी जवळपास सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन हिंगोली शहर ठाण्यात आणुन बसविले होते. कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊन अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार धरले जाईल अशा आशयाच्या नोटीस संबधितांना बजावल्या होत्या. मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळे अनेकांना नाईलाजाने पोळा सणाच्या दिवशीच ठाण्यात आणुन बसविण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात होता.
 

Web Title: Chief Minister's visit to Hingoli and many others in detention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.