शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

शहरात उपाशी जगण्यापेक्षा गावी गेलेलं बरं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी लॉकडाऊन काळात झालेली हेळसांड लक्षात घेता या लॉकडाऊनमध्ये गैरसोय होऊ ...

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी लॉकडाऊन काळात झालेली हेळसांड लक्षात घेता या लॉकडाऊनमध्ये गैरसोय होऊ नये, यासाठी मजूर आतापासूनच गावाकडे परतत आहेत. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात मजुरांचे जत्थे दिसत आहेत. तसेच खासगी वाहनांद्वारे मजूर गावी निघाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरूच आहे. आता तर शकडो रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनही हतबल झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता लॉकडाऊन लागण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. शासनही तशी तयारी करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे केव्हाही लॉकडाऊन लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये मजूर, कामगारांना सर्वात जास्त फटका बसला. एसटी बसेस, रेल्वे यासह सर्वच वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे कामगार, मजुरांना पायी गाव गाठावे लागले होते. मध्यंतरी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने मजूर, कामगार पुन्हा मोठ्या शहरात कामानिमित्त दाखल झाले होते. आता पुन्हा लॉकडाऊन लागले तर शहरातच अडकून पडावे लागेल या भीतीने मजूर आतापासूनच गावाकडे परत निघाले आहेत. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक परिसरात मजूर थांबलेले दिसून येत आहेत. खासगी वाहनानेही मजूर गावाकडे परत असल्याचे चित्र दिसून येत आहे. १२ एप्रिल रोजी शहरात पाहणी केली असता एका ट्रॅक्टरमधून मजूर गावाकडे परभणी जिल्ह्यात जात असताना आढळून आले. हे मजूर नागपूर जिल्ह्यात कामानिमित्त गेले होते.

शहरापेक्षा गाव बरे

कामानिमित्त शहरात गेलो होतो. पुन्हा लॉकडाऊन लागल्यास गतवर्षीप्रमाणे गैरसोय होऊ नये, यासाठी गावाकडे निघालो आहे. लॉकडाऊन लागल्यास वाहने बंद झाली तर शहरातच आडकून पडलो असतो.

- राजेभाऊ चव्हाण, गंगाखेड (फोटो)

नागपूर जिल्ह्यात ऊसतोडीसाठी गेलो होतो. मात्र आता लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. गतवर्षी लॉकडाऊनमध्ये अडकून पडलो होतो. याही वर्षी गैरसोय होईल, म्हणून आम्ही सर्वजण गावाकडे ट्रक्टरने निघालो आहोत.

-राऊडी राठोड, गोदावरी तांडा (जि. परभणी) (फोटो)

नागपूर जिल्ह्यात कुटुंबीयांसह कामानिमित्त गेलो होतो. लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने आमच्या सोबतचे सर्वच कामगार, मजूर गावाकडे निघाले आहेत. आमचीही हेळसांड होऊ नये, यासाठी ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावाकडे निघालो आहे. गावाकडे किमान उपाशी तरी राहणार नाही.

- केशव राठोड, पोहंडूळ तांडा (जि. परभणी)

परभणी, अकोला मार्गावर गर्दी

१)हिंगोली जिल्ह्यात फारसे कारखाने, उद्योग नसल्याने या जिल्ह्यातील कामगार मोठ्या शहरात कामानिमित्त स्थलांतरित झाले आहेत. आता ते पुन्हा गावाकडे परतत आहेत. बहुतांश मजूर हे खासगी वाहनांनी गावाकडे परत येत आहेत.

२) येथील रेल्वे, बसस्थानकावर आरोग्य विभागाकडून कोरोना तपासणीसाठी पथक नियुक्त केले आहे. ही माहिती परत येणाऱ्या मजुरांपर्यंत पोहोचली आहे. कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली तर आठ दिवस दवाखान्यात थांबावे लागेल याची भीती असल्याने हे मजूर खासगी वाहनांनी गाव गाठत आहेत.

३) मजूर, कामगार ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रकच्या मदतीने गावाकडे परत जात असल्याचे परभणी, अकोला, नांदेड मार्गावर दिसून येत आहे. दिवसभरातून कामगारांचे एखादे तरी वाहन या मार्गावरून जात असल्याचे दिसून येत आहे.