शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वसमतच्या मातीत 'बंगळुरू पॅटर्न'; साडेतीन वर्षांत फुलली नारळाची बाग, आंतरपीक आंब्यातूनही उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 14:24 IST

पारंपरिक शेतीला फाटा! हिंगोलीच्या शेतकऱ्याने बंगळुरूवरून आणली नारळाची रोपे

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा (ता. वसमत) येथील प्रगतिशील शेतकरी मनोज साहेबराव इंगोले यांनी कर्नाटकच्या धर्तीवर आपल्या ६ एकर शेतात नारळ आणि आंबा शेतीचा प्रयोग साकारला आहे. केवळ साडेतीन वर्षांत नारळाच्या झाडांना फुलोरा येऊ लागल्याने परिसरात या प्रयोगाची मोठी चर्चा होत आहे.

मनोज इंगोले यांनी कर्नाटक राज्यातील बंगळुरू येथील नारळ शेतीला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तंत्रज्ञान समजून घेतले. त्यानंतर त्यांनी थेट बंगळुरूवरून नारळाची १ हजार उच्च दर्जाची रोपे आणली. आपल्या ६ एकर शेतात १५ ते २० फूट अंतरावर रोपांची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. झाडांची योग्य निगा, दर आठ दिवसांनी पाणी आणि बंगळुरूच्या धर्तीवर खत व्यवस्थापन केल्यामुळे ही झाडे आज डौलाने उभी आहेत.

नारळात आंब्याचे आंतरपीककेवळ नारळावर अवलंबून न राहता इंगोले यांनी आंतरपीक म्हणून त्याच बागेत केशर आणि दशहरी जातीच्या आंब्याची ८६५ रोपे लावली आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या दोन वर्षांतच आंब्याला फळधारणा सुरू झाली, तर आता साडेतीन वर्षांनंतर नारळालाही फुलोरा (कणसे) येऊ लागल्याने शेतकऱ्याच्या कष्टाला फळ मिळाले आहे..

शासकीय अनुदानाची प्रतीक्षा आणि नाराजीएकीकडे निसर्गाशी झुंज देत शेतकरी नवनवीन प्रयोग करत असताना, दुसरीकडे शासन आणि कृषी विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. कृषी विभागाने अशा फळबागांसाठी तांत्रिक मार्गदर्शन केल्यास अधिक फायदा होईल. लागवडीसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. संबंधित विभागाने कागदपत्रांची पूर्तता करून सहकार्य करावे, अशी मागणी केली जात आहे.

अनुदानासाठी चकरा मारायला लावू नयेमी बंगळुरूवरून रोपे आणून जिद्दीने ही बाग फुलवली आहे. साडेतीन वर्षांत नारळाला फुलोरा आल्याने समाधानी आहे. भविष्यात यातून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे. मात्र, शासनाने आम्हा शेतकऱ्यांना अनुदानासाठी चकरा मारायला लावू नये. वेळेवर मदत आणि मार्गदर्शन मिळाल्यास वसमतचा शेतकरी नक्कीच प्रगती करील.-मनोज साहेबराव इंगोले, प्रगतिशील शेतकरी, कुरुंदा

English
हिंदी सारांश
Web Title : Bangalore Pattern in Vasmat: Coconut Garden Flourishes, Intercrop Mango Yields

Web Summary : Farmer Manoj Ingole cultivated a thriving coconut and mango orchard in Vasmat, inspired by Bangalore farming techniques. In just three and a half years, the coconut trees are flowering, with intercropped mangoes already producing income. He seeks timely government support for fellow farmers.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रHingoliहिंगोली