शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य पळविणारे चोरटे बाळापूर पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:29 IST

हिंगोली : दुकाने फोडून त्यातील धान्य पळविणाऱ्या तीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. त्यांना ...

हिंगोली : दुकाने फोडून त्यातील धान्य पळविणाऱ्या तीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम जिल्ह्यातून ताब्यात घेतले होते. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. आता त्यांना आखाडा बाळापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

जिल्ह्यात गंगानगर (हिंगोली), खानापूर चित्ता, कळमनुरी, आखाडा बाळापूर येथे एकूण ५ दुकाने फोडून त्यातील धान्य लांबविल्याचे घटना घडल्या होत्या. धान्य चोरणारी टोळी सक्रिय झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. उदय खंडेराय यांनी पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांचे पथक नियुक्त केले. धान्य चोरी करणारी टोळी वाशिम जिल्ह्यात असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यावरून अकोला जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या व ३० ते ४० घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हसन ऊर्फ इमी छट्टू निनसुरवाले (रा. गवळीपुरा कारंजा) यास ताब्यात घेतले. त्यास विचारपूस केली असता त्याने फिरोजखान जसिमखान पठाण (रा. कालापाणी, कारंजा लाड) व मोईन ऊर्फ अन्ना चाँद लंगे (रा. कारंजा) यांच्या मदतीने एम.एच.३७ ए ३२६६ क्रमांकाच्या महिंद्रा झायलो कारचा वापर करून चोऱ्या केल्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून कार व चोरीला गेलेले धान्य असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, चोरट्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना ३ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्यांना हिंगोली ग्रामीण पोलिसांकडून आखाडा बाळापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती स्थागुशातून देण्यात आली. आखाडा बाळापूर येथेही धान्य पळविल्याची घटना घडली होती.

चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

धान्य चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्याने व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी नेमलेल्या पथकात पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार बालाजी बोके, संभाजी लेकूळे, विठ्ठल कोळेकर, राजू ठाकूर, ज्ञानेश्वर पायघन, आकाश टापरे, प्रशांत वाघमारे, असलम गारवे, जयप्रकाश झाडे, सुमित टाले, इरफान पठाण आदींचा समावेश होता.

फोटो न. ०५