शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हळदीसाठी शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST

कृषीविज्ञान केंद्र, तोंडापूर आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने "स्थानिक बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी सेंद्रिय हळद शेतीचे प्रमाणीकरण" या ...

कृषीविज्ञान केंद्र, तोंडापूर आणि किसान यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन पद्धतीने "स्थानिक बाजारपेठेसाठी व निर्यातीसाठी सेंद्रिय हळद शेतीचे प्रमाणीकरण" या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी देशमुख म्हणाले, सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यास दोन वर्षांनीसुद्धा प्रमाणीकरण करता येऊ शकते. सेंद्रिय शेतीची नोंदणी केल्याबरोबर "सर्टिफाइड ऑरगॅनिक ग्रेड-१" असे लेबल लावून त्याचप्रमाणे प्रमाणीकरण संस्थेचा लोगो लावून मालाची विक्री करण्यास सुरुवात करता येते. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा याचप्रकारे ग्रेड-२ आणि ग्रेड-३ लिहून विक्री करता येते. प्रमाणीकरण झाल्यानंतर इंडिया ऑरगॅनिक हा लोगो लावून मालाची विक्री करता येते, अशी माहिती दिली.

कृषीविज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्र व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी देशातील हळदीचे निर्यातदार हे सेंद्रिय हळदीची मागणी करीत असून त्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीचे प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया शक्य तितक्या लवकर करावी. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात शेतजमिनीचे प्रमाणीकरण करावयाचे असल्यास त्यासाठी वार्षिक सुमारे १५ हजार रुपये खर्च येतो आणि त्यासाठी पुणे येथील नॅचरल ऑरगॅनिक सर्टिफिकेशन एजन्सी (NOKA) यांची मदत घेता येईल. लहान शेतकऱ्यांसाठी गटाने नोंदणी करणे शक्य असून त्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास २०० शेतकऱ्यांसाठी वार्षिक सुमारे ४० हजार रुपये खर्च होईल. यामुळे हळदीला चांगला भाव मिळेल, असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन प्रा. अनिल ओळंबे यांनी केले तर दीपक खेमलापुरे यांनी आभार मानले.