शहरं
Join us  
Trending Stories
1
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
2
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
4
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
5
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
6
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
7
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
8
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
9
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
10
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
11
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
12
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
13
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
15
सीबीआयची नागपूर-चंद्रपूरमध्ये झडती
16
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
17
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
18
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
19
जगातील टॉप-१०० मधून भारतीय कंपन्या हद्दपार; रिलायन्सही या स्थानावर घसरली...
20
मंदिरांमधील सोने सरकार विकणार आहे ? चर्चा आणि अफवांना सरकारने दिला पूर्णविराम 
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री ६ दुकाने फोडली; औषधी, किरणासह रोकड लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 14:02 IST

शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

- इस्माईल जाहागिरदार
वसमत:
शहरातील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स व एसबीआय बँक परीसरातील ६ दुकानांचे चोरट्यांनी शटर वाकवून चोरी केली. दुकानातील किराणा, औषधासह नगदी ९५ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाले असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

शहरात आज पहाटे नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स व एसबीआय बँक परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील किराणा दुकान, कृषी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, औषधी दुकान, जनरल स्टोअर्स या दुकानांची शटर वाकवून चोरटे आत शिरले. किराणा सामान, औषधीसह सेतू सुविधा केंद्रामधील ९५ हजार रुपये चोरट्यांनी पळवले. दरम्यान, दुकानांचे शटर वाकवून दुकानात प्रवेश करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. चोरट्यांची ओळख पटविण्यासाठी शहर पोलिस प्रयत्न करत आहेत. 

घटनास्थळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम, जमादार शेख हकीम, जोंधळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. गेल्या वर्षी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. शहर पोलिस ठाण्याचे पोनि कदम यांनी गुन्हेगारीवर पकड निर्माण करताच शहरातील चोऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. दरम्यान, एकाच रात्री ६ दुकाने फोडल्याने शहरात चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे ठाकले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली