शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

३६ गर्भवती व बाळंतिणी कोरोनातून मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:28 IST

तालुकानिहाय आकडेवारी कळमनुरी ११ वसमत ११ औंढा ९ सेनगाव २ हिंगोली ३ गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्यास.. गर्भवती महिला पॉझिटिव्ह ...

तालुकानिहाय आकडेवारी

कळमनुरी ११

वसमत ११

औंढा ९

सेनगाव २

हिंगोली ३

गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्यास..

गर्भवती महिला पॉझिटिव्ह आल्यास नियमित रुग्णांपेक्षा थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. एक तर या महिलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. शिवाय बाळालाही कोरोना होण्याचा धोका असतो. त्यामुळे या दोन्हींचा मेळ घालून परिस्थितीनुरूप उपचार करून या रुग्णांना विशेष पद्धतीने हाताळावे लागते. त्यात अशा महिलाही कोरोनातून बाहेर पडतात.

हिंगोली जिल्ह्यात जवळपास ५० महिला गर्भवती असताना अथवा बाळंतपणात कोरानाबाधित असल्याचे आढळून आले. अनेकींचे सीझर करून बाळ व बाळंतीण दोन्ही सुखरूप या आजारातून बाहेर पडले. या महिलांवर उपचार करताना त्यांची कमी प्रतिकारशक्ती लक्षात घेता ऑक्सिजन बेडसह सर्व प्रकारची काळजी घ्यावी लागते. हिंगोली जिल्ह्यात अशाप्रकारची काळजी घेत अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्यचिकित्सक

बाळ व बाळंतीण सुखरूप

हिंगोली जिल्ह्यात काही नोंदी घेण्याचे काम योग्यरीत्या झाले नाही. त्यामुळे ३६ महिलांची नोंद असली तरीही ५० पेक्षा जास्त जणींना बाधा झाली होती. या सर्वच प्रकरणांत बाळ व बाळंतीण दोघांना सुखरूपरीत्या या आजारातून बाहेर काढण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. अगदी सुरुवातीच्या काळात या आजाराची भीती असतानाच एक गर्भवती महिला बाधित असल्याचे औंढा व कळमनुरी तालुक्यात आढळून आले होते. त्यानंतर जागृतीस प्रारंभ झाला. या महिलांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे असते. बाळंतिणीची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना कोरोनासारखा आजार लवकर जडताे. त्यामुळे काळजी घेतल्याने अनेकींनी या आजारापासून दूर राहण्यात यश मिळविले, तर ज्यांना हा आजार झाला त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.