विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १८ हजार रुपये दंडापोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:13+5:302021-02-23T04:46:13+5:30

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये नगरपालिका व पोलीस प्रशासनाने २० फेब्रुवारीपासून मास्क न घालणाऱ्या ...

18,000 fine recovered from citizens walking around without masks | विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १८ हजार रुपये दंडापोटी वसूल

विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून १८ हजार रुपये दंडापोटी वसूल

हिंगोली: जिल्ह्यात कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये नगरपालिका व पोलीस प्रशासनाने २० फेब्रुवारीपासून मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी केलेल्या संयुक्त कार्यवाहीत १८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशान्वये २० फेब्रुवारीपासून नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने मास्क न घालता रस्त्यांवरून फिरणाऱ्या नागिरकांना दंड लावण्यास सुरुवात केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी ६ हजार ८०० तर २२ फेब्रुवारी रोजी दंडापोटी १८ हजार रुपये वसूल केले आहेत. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पथकांची स्थापना करण्यात आली. शहरात दोन ठिकाणी हे पथक तैनात करून ९० नागरिकांकडून १८ हजार रुपये दंडापोटी वसूल केले आहेत. त्याचबरोबर रामाकृष्णा इंटरनॅशनल हॉटेलला सामाजिक सुरक्षित अंतर न पाळणे व मास्क न लावणे यासाठी प्रशासनाच्या वतीने ५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

नगर परिषदेने नेमलेल्या पथकात मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, पथकप्रमुख डी. पी. शिंदे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, बी. के. राठोड,पंडित मस्के, प्रवीण चव्हाण, नागेश नरवाडे, अमर ठाकूर, पवन खरात, सुषमा भाटेगावकर, विकास गवळी, बळीराम शिंदे यांचा समावेश होता.

फोटो ७

Web Title: 18,000 fine recovered from citizens walking around without masks