शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचे नवे १२१ रुग्ण; पाचजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:29 IST

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी, ९ मे रोजी कोरोनाचे १२१ नवे रुग्ण आढळले असून, १४२ जण बरे झाल्याने त्यांना घरी ...

हिंगोली : जिल्ह्यात रविवारी, ९ मे रोजी कोरोनाचे १२१ नवे रुग्ण आढळले असून, १४२ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हिंगोली जिल्ह्यात १४२ जणांची रॅपिड अँटिजन चाचणी केली असता सहाजण कोरोनाबाधित आढळले. यात हिंगोली परिसरात ९६ पैकी १, वसमत परिसरात २ पैकी १, सेनगाव १५ पैकी १, औंढा नागनाथ परिसरात २९ पैकी ३ रुग्ण आढळून आले. तसेच आरटीपीसीआर टेस्टमध्ये ११५ नवे रुग्ण आढळले आहेत. यात हिंगोली परिसरातील ५५ रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर वसमत परिसरात ८ रुग्ण आढळले असून, कळमनुरी परिसरात १२, औंढा परिसरात २१, सेनगाव परिसरात १९ रुग्ण आढळले. दरम्यान, ९ मे रोजी उपचार घेणारे १४२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील ५८ रुग्ण घरी सोडले असून, यात सामान्य रुग्णालयात उपचार घेणारे २८, तर संदर्भित केलेले २० बरे झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. लिंबाळा कोरोना केअर सेंटरमधील २७, वसमत १२, कळमनुरी ३२, औंढा नागनाथ ९, तर सेनगाव कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ४ रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आजपर्यंत जिल्ह्यात १४ हजार १८३ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १३ हजार १९ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८८४ रुग्णांवर उपचार सुरू असून, ४१४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यातील ३८२ रुग्णांना ऑक्सिजनवर, तर ३२ रुग्णांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.

मृत्यूचा आकडा २८० वर

जिल्ह्यात ९ मे रोजी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. हिंगोली आयसोलेशन वाॅर्डातील ४ रुग्णांचा समावेश असून, यात कंजारा (ता. औंढा ना.) येथील ६५ वर्षीय पुरुष, जलालधाबा (ता. औंढा) येथील ७२ वर्षीय पुरुष, केंद्रा (ता. सेनगाव) येथील ५० वर्षीय महिला, येळी तांडा येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच हिंगोली येथील नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये भोईपुरा (हिंगोली) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनाने २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.