टॅबलेटच्या मधोमध एक लाइन कशासाठी दिलेली असते? डिझाइन समजण्याची करू नका चूक, पाहा नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 13:18 IST2026-04-17T13:18:06+5:302026-04-17T13:18:45+5:30
What Does Line on Pills Mean : मेडिकलच्या भाषेत टॅबलेटवर असलेल्या या लाइनला स्कोर लाइन म्हटलं जातं. पण ही लाइन का असते हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.

टॅबलेटच्या मधोमध एक लाइन कशासाठी दिलेली असते? डिझाइन समजण्याची करू नका चूक, पाहा नेमकं कारण
What Does Line on Pills Mean : रोज आपल्यासमोर अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा आपण कधी विचारच करत नाही किंवा त्यांच्यातील वेगळेपणाकडे आपलं लक्षच जात नाही. एखादी गोष्ट तशी का आहे, याचाही फारसा विचार केला जात नाही. मेडिकलमध्ये मिळणाऱ्या टॅबलेटबाबतही अशीच एक गोष्ट आहे. आपण पाहिलं असेल की, काही टॅबलेटवर मधे एक लाइन असते, तर काहींवर नसते. सामान्यपणे बऱ्याच लोकांना वाटतं की, ही लाइन केवळ डिझाइन म्हणून असेल. पण मुळात ही लाइन असण्याचं एक खास कारण आहे. मेडिकलच्या भाषेत टॅबलेटवर असलेल्या या लाइनला स्कोर लाइन म्हटलं जातं. पण ही लाइन का असते हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, काही टॅबलेट्सवर स्कोर लाइन असते कारण टॅबलेट दोन भागात सहजपणे तोडता यावी. जेणेकरून काही रूग्णांना जर अर्धी गोळी घेण्याचा सल्ला दिला गेला असेल तर ते योग्य डोज घेऊ शकतील. तर काही टॅबलेटवर ही लाइन केवळ मॅन्युफॅक्टरिंग प्रक्रियेमुळे असते किंवा ओळख पटावी यासाठी बनवलेली असते. इतकंच नाही तर काही टॅबलेट्स अशा असतात, ज्यांवर ही स्कोर लाइन नसते. याचा अर्थ असा की, ती गोळी तोडू नये, असं केलं तर तिचा योग्य तो परिणाम होणार नाही.
एक्सपर्टनुसार, काही औषधं ही एंटेरिक-कोटेड किंवा सस्टेन्ड रिलीज असतात, त्यामुळे त्या तोडल्या तर त्यांचा प्रभाव बदलू शकतो. जर अशा गोळ्या मधून तोडल्या तर औषध अचानक शरीरात रिलीज होऊ शकतं, ज्यामुळे साइड इफेक्ट होऊ शकतो. असंही होऊ शकतं की, औषध योग्यपणे काम करणार नाही. जर टॅबलेटवर स्कोर लाइन आहे आणि डॉक्टरांनी तोडण्याचा सल्ला दिला असेल तरच ती तोडावी. जर याबाबत काही शंका असेल किंवा समजलं नसेल तर डॉक्टरांना विचारायला हवं.
म्हणजेच काय तर टॅबलेटवर असणारी लाइन ही केवळ डिझाइन नाही. एक कामाची फिचर आहे. जर आपल्याला गोळी मधून तोडायची असेल तर याने मदत मिळते. ज्या गोळीवर स्कोर लाइन नसते, ती तोडाल तर ती बरोबर भागात तुटत नाही. त्यामुळे ही लाइन रूग्णांसाठी बरीच फायदेशीर ठरते. पण सगळ्यात टॅबलेट तोडणं योग्य नसतं. त्यामुळे औषध घेण्याआधी त्याची माहिती नक्की घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका.