सॉक्स काढताच पायांच्या त्वचेवर दिसतात ठसे - चट्टे? नॉर्मल समजण्याची करू नका चूक, पाहा कशाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:20 IST2026-04-17T11:20:04+5:302026-04-17T11:20:58+5:30

जर नेहमीच पायांवर सॉक्समुळे ठसे पडत असतील आणि जास्त वेळ राहत असतील तर हा शरीरात काहीतरी गडबड असण्याचा संकेत असू शकतो.

Why do marks appear on your feet, know the causes and how to prevent it | सॉक्स काढताच पायांच्या त्वचेवर दिसतात ठसे - चट्टे? नॉर्मल समजण्याची करू नका चूक, पाहा कशाचे संकेत

सॉक्स काढताच पायांच्या त्वचेवर दिसतात ठसे - चट्टे? नॉर्मल समजण्याची करू नका चूक, पाहा कशाचे संकेत

आपण पाहिलं असेल की, सॉक्स म्हणजे मोजे काढल्यानंतर पायांवर ठसे पडतात म्हणजे त्वचा दबलेली दिसते.  जास्तीत जास्त लोक आज दिवसभर सॉक्स घालून राहतात आणि जेव्हा काढतात तेव्हा पायांवर चट्टे - ठसे दिसतात. सॉक्स टाइट असणे किंवा इलास्टिकमुळे असं झालं असेल असं समजून याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही बाब नॉर्मल नाही. जर नेहमीच पायांवर सॉक्समुळे ठसे पडत असतील आणि जास्त वेळ राहत असतील तर हा शरीरात काहीतरी गडबड असण्याचा संकेत असू शकतो. खासकरून जेव्हा सूज किंवा जड वाटत असतील, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

शूजसोबत सॉक्स घातल्याने पायांना सुरक्षा मिळते. शूजमुळे होणारं पायांचं घर्षण यामुळे टाळलं जातं. सॉक्स पायांसाठी एका सपोर्टसारखे काम करतात. जर सॉक्स काढल्यानंतरही बराच वेळ जर पायांवर ठसे दिसत असतील तर समजून घ्या की, आपल्याला आरोग्यासंबंधी काहीतरी समस्या आहे. 

पेरिफरल एडिमा

सॉक्समुळे पायांवर दिसणारे हलके ठसे फार काही चिंताजनक नसतात. पण जर पायांवर सूज, टाचांवर किंवा घोट्यांवर सूज दिसत असेल, त्वचा टाइट झाली असेल, चमकदार दिसत असेल, पाय कडक झाले असतील किंवा वेदना होत असतील तर हे पेरिफरल एडिमाचे संकेत असू शकतात. ही समस्या शरीराच्या खालच्या भागातील टिशूजमध्ये फ्लूइड जमा झाल्यानेही होते.

नसांसंबंधी समस्या 

जर सॉक्स काढल्यानंतर काही मिनिटांपर्यंत आपल्या नसा जास्त ताणलेल्या किंवा स्पष्ट दिसत असतील तर पाय टाइट किंवा वेदना होतात. त्वचेचा रंग बदललेला दिसत असेल तर नसांसंबंधी समस्या असू शकते. पुरूषांच्या तुलनेत ही समस्या महिलांमध्ये जास्त बघायला मिळते. अशात वेस्कुलर स्पेशलिस्टला दाखवणं कधीही चांगलं.

औषधांचाही पडतो प्रभाव

आपण जर एखाद्या आजाराची औषधं बऱ्याच दिवसांपासून घेत असाल, तर त्या औषधांमुळेही टाचा किंवा घोट्यांची साइज वाढलेली दिसू शकते.

कधी व्हाल सावध?

जर सॉक्समुळे पायांवर पडलेले ठसे काही वेळातच गायब होत असतील, तर चिंतेची बाब नाही. पण जर हे ठसे जास्त वेळ राहत असतील, पायांवर सूज दिसत असेल, त्वचा टाइट झाली असेल, वेदना होत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. खासकरून जर एका पायामध्ये जास्त सूज दिसत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

कसा कराल बचाव?

फार जास्त टाइट सॉक्स घालणे टाला आणि आरामदायक कापड निवडा. दिवसा काही वेळ पाय उंचावर ठेवून आराम करा. जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसू नका. कामातून थोडा वेळ काढून हलका वॉक करा. एकसारखे जास्त वेळ बसून राहू नका. त्याशिवाय मीठ कमी खा आणि दिवसभर भरपूर पाणी प्या.

Web Title : मोज़े निकालने पर निशान? अनदेखी न करें, ये स्वास्थ्य समस्याओं का संकेत है।

Web Summary : मोज़े निकालने पर गहरे निशान पेरिफेरल एडिमा या तंत्रिका संबंधी समस्याओं जैसी अंतर्निहित स्वास्थ्य समस्याओं का संकेत दे सकते हैं। सूजन, दर्द या त्वचा का रंग बदलना चिकित्सीय ध्यान देने योग्य है। तंग मोज़े से बचें, पैरों को ऊपर उठाएं और हाइड्रेटेड रहें।

Web Title : Socks leaving marks? Don't ignore, it signals potential health issues.

Web Summary : Socks leaving deep marks can indicate underlying health problems like peripheral edema or nerve issues. Swelling, pain, or skin discoloration needs medical attention. Avoid tight socks, elevate feet, and stay hydrated.