अंगावरून सतत पांढरं पाणी जातयं?; वेळीच सावध व्हा अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:04 PM2019-11-01T12:04:54+5:302019-11-01T12:11:50+5:30

व्हाइट डिस्चार्ज म्हणजे, अंगावर पांढरे जाणे. ही समस्या साधारण आहे. पण अनेकदा या साधारम समस्येमुळे महिलांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम दिसून येतो.

What should women do if there is a problem of white discharge | अंगावरून सतत पांढरं पाणी जातयं?; वेळीच सावध व्हा अन्यथा...

अंगावरून सतत पांढरं पाणी जातयं?; वेळीच सावध व्हा अन्यथा...

googlenewsNext

व्हाइट डिस्चार्ज म्हणजे, अंगावर पांढरे जाणे. ही समस्या साधारण आहे. पण अनेकदा या साधारम समस्येमुळे महिलांच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम दिसून येतो. सर्वसामान्यपणे प्रत्येक स्त्रीला मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर 2-3 दिवस पांढरं पाणी अंगावर जात असतं. परंतु, त्याचं प्रमाण वाढलं तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकतं. व्हाइट डिस्चार्जला पांढरं पाणी आणि लिकोरिया असंही म्हणतात. पीरियड्सआधी किंवा नंतर व्हाइट डिस्चार्ज होणं एक सामान्य गोष्ट आहे. पण अनेकदा याचं प्रमाण वाढतं. हा प्रॉब्लेम एखाद्या रोगाचा संकेतही असू शकतो. आज जाणून घेऊया व्हाइट डिस्चार्ज होण्याची कारण आणि त्यावरील उपाय... 

व्हाइट डिस्चार्ज होण्याची कारणं : 

- प्रायव्हेट पार्टची व्यवस्थित सफाई न राखणं 
- एखाद्या गोष्टीला जास्त घाबरणं 
- सतत गर्भपात होणं 
- एखादं इन्फेक्शन किंवा आजारामुळे 
- शरीरात होणारी पोषक तत्वांची कमतरता 
- सर्वसाधारणपणे अतिद्रव आहार, अतिमधुर किंवा गोड पदार्थ, अतिखारट, उष्ण-तीक्ष्ण पदार्थ, शिळं अन्न आहारात जास्त येणं
- मानसिक ताणतणाव, अतिविचार करणं. 

लक्षणं 

- चक्कर येणं
- शरीराला थकवा जाणवणं
- प्राइवेट पार्टमध्ये खाज येणं
- अस्वस्थ वाटणं
- प्राइवेट पार्टमधून दुर्गंधी येणं
- बद्धकोष्ट किंवा डोकेदुखी सतावणं 

अशी घ्या काळजी : 

- व्हजायनाची काळजी घ्या, तसेच स्वच्छता राखा. यामुळे इन्फेक्शन पसरण्याची शक्यता कमी होते. 
- मासिक पाळीमध्ये स्वच्छतेची काळजी घ्या. तसेच प्रत्येक 4 ते 6 तासांनी सॅनिटरी पॅड चेजं करा. हलक्या गरम पाण्याने स्वच्छ करून, एखाद्या सुती कपड्याने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखा. 
- कॉटनच्या अंडरविअर वापरा. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी असतो. 
- कॉटन की अंडरवियर पहने इससे वजाइना में संक्रमण का खतरा कम रहता हैं।

ही समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय : 

- भाजलेले चणे आणि गुळ बारिक करून दूध आणि सुद्ध तूपासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. 
- रात्री पाण्यामध्ये अंजीर भिजत घातलेले अंजीर सकाळी कोमट पाण्यामध्ये वाटून अनोशापोटी त्याचं सेवन करा. 
- आपल्या डाएटमध्ये केळीचा समावेश करा. 
- तुरटी गरम पाण्यात भिजवून त्याच पाण्याने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करा. असं केल्याने एका आठवड्यात व्हाइट डिस्चार्जची समस्या कमी होते. 
- तांदळू पाण्याच उकडून त्या पाण्याने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता राखा. 
- एक लीटर पाण्यामध्ये आल्याचे काही तुकडे व्यवस्थित उकळून घ्या. जेव्हा पाणी अर्ध राहिल, त्यावेळी गाळून ते पाणी प्या. 
- गुलाबाची पानं सुकवून त्यांची पावडर तयार करा आणि दररोज गरम दूधासोबत याचं सेवन करा. 
- मेथीचे दाणे पाण्यात उकळून घ्या. त्या पाण्याने प्रायव्हेट पार्टची स्वच्छता करा. तसेच तुम्ही मेथीच्या दाण्याचे चुर्ण पाण्यासोबत एकत्र करून त्याचं सेवन करा. 
- ल्यूकोरियाच्या समस्येमुळे शरीरामध्ये अशक्तपणा येतो. त्यामुळे आपल्या खाण्यात पोषक तत्वांचा समावेश करा. ज्यामुळे तुमचं शरीर पूर्णपणे हेल्दी राहतं. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

Web Title: What should women do if there is a problem of white discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.