शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

८-१० ग्लास की जास्त...वजनानुसार आपण रोज किती पाणी प्यायला हवं? पाहा काय आहे याचा सोपा फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 11:33 IST

Water Drinking Tips : आपण नेहमीच ऐकलं असेल की, दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्यास सांगितलं जातं. पण मॉडर्न सायन्सचा नियम वेगळा आहे.

Water Drinking Tips : उन्हाळा दरवर्षीच येतो आणि तापमानही बरंच असतं. पण कधी नव्हे तो यावेळी सूर्य फार जास्त तापतोय. म्हणजे देशातील कितीतरी भागांमध्ये तापमान ४२-४५ च्या वर गेलंय. अर्थातच गरमीमुळे हाल बेहाल झाले आहेत. लोकांची तब्येत बिघडू लागली आहे. अशात सगळेच हेल्थ एक्सपर्ट सतत लोकांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देताहेत. पण भरपूर पाणी म्हणजे किती? असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. आपण नेहमीच ऐकलं असेल की, दिवसभरातून किमान ८ ते १० ग्लास पाणी पिण्यास सांगितलं जातं. पण मॉडर्न सायन्सचा नियम वेगळा आहे. मुळात पाण्याची गरज प्रत्येक व्यक्तीचं शरीर, अॅक्टिविटी आणि त्यांच्या वजनानुसार वेगवेगळी असते.   

सामान्यपणे जर आपण आपल्याला गरज आहे त्यापेक्षा कमी पाणी प्यायलो, तर थकवा येणे, चक्कर येणे अशा समस्या होतात. तर कशाचाही विचार न करता जास्त पाणी प्याल तर याने किडनीवर अधिक दबाव पडतो. अशात आपण किती पाणी प्यायला हवं, हे माहीत असणं फार महत्वाचं ठरतं.   

वजनानुसार किती पाणी प्यायला हवं?  

यूनिव्हर्सिटी ऑफ मिसूरीच्या रिपोर्टनुसार, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी किती पाणी प्यावं याचा काही एक फिक्स नियम नाही. हे सगळं आपल्या शरीरावर ठरतं. रिसर्चमध्ये एक सरळ आणि सोपा उपाय सांगण्यात आलाय. ज्यावरून आपण ठरवू शकता की, आपल्या शरीराला किती लीटर पाण्याची गरज आहे.  उदाहरण द्यायचं तर जर आपलं वजन ६० किलो असेल तर त्याला ३० ने विभागलं तर उत्तर दोन येतं. म्हणजे आपल्याला दिवसभरात कमीत कमी २ लीटर पाणी प्यावं लागेल. तेच जर कुणीचं वजन ९० किलो असेल तर त्यांना कमीत कमी ३ लीटर पाण्याची गरज असेल.   

उन्हाळ्यात वाढते पाण्याची गरज  

मायो क्लीनिकनुसार, या फॉर्म्यूल्याने एक बेसिक गरज लक्षात येते. पण जेव्हा तापमान ४० डिग्रीच्या वर जातं, तेव्हा गणित थोडं बदलतं. मेयो क्लीनिकच्या रिसर्चनुसार, जर आपण उन्हात बाहेर निघत असाल किंवा व्यायाम करत असाल तर घामाद्वारे बाहेर पडणारे इलेक्ट्रोलाइट्स परत मिळवण्यासाठी दर तासाच्या अॅक्टिविटीवर साधारण ३५० मिली जास्त पाणी प्यावं लागेल. सोबतच जर आपण चहा-कॉफी जास्त पित असाल तर आपल्याला आणखी जास्त पाण्याची गरज पडू शकते. कारण जास्त कॅफीनमुळे शरीर डिहायड्रेट होतं.   

तहान लागण्याची वाट बघू नका   

जास्तीत जास्त लोक असंच करतात की, जेव्हा घसा कोरडा पडतो, तेव्हा पाणी पितात. म्हणजे लोक पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट बघत बसतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की, तहान लागणं या गोष्टीचा संकेत असतो की, आपलं शरीर आधीच १ ते २ टक्के डिहायटड्रेट झालंय. हे टाळण्यासाठी गरजेचं आहे की, थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं पाणी पित रहावं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Calculate Daily Water Intake Based on Your Weight for Hydration

Web Summary : Drink water based on your weight. Multiply your weight (kg) by 30, divide by 1000 for daily liters. Increase intake during summer, exercise, or with caffeine consumption. Drink before feeling thirsty to avoid dehydration.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSummer Specialसमर स्पेशल