श्वास घेण्यास त्रास आणि हृदयाचे ठोके वाढतात? एंझायटीचे असू शकतात संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:29 IST2026-05-16T11:28:37+5:302026-05-16T11:29:58+5:30
Anxiety Symptoms : बरेच लोक एंझायटीचे शिकार असतात, पण त्यांना ते माहितीच नसतं. त्यामुळे एंझायटीची लक्षणं काय असतात माहीत करून घेऊयात.

श्वास घेण्यास त्रास आणि हृदयाचे ठोके वाढतात? एंझायटीचे असू शकतात संकेत
Anxiety Symptoms : लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगाप्रमाणेच आणखी एक आजार महामारीसारखा लोकांमध्ये पसरतोय तो म्हणजे एंझायटी म्हणजेच चिंता. चिंता वाढण्याची कारणं प्रत्येकाची वेगवेगळी असू शकतात. पण हीच चिंता जर वेळीच थांबवली गेली नाही तर डिप्रेशनमध्ये जाऊ शकता. ज्यातून बाहेर पडणं फारच अवघड असतं. चिंता ही एक मानसिक स्थिती आहे. जी अनेकदा बाहेरील किंवा आतील असू शकते. बरेच लोक एंझायटीचे शिकार असतात, पण त्यांना ते माहितीच नसतं. त्यामुळे एंझायटीची लक्षणं काय असतात माहीत करून घेऊयात.
चिंता ही मनाची एक स्थिती आहे, ज्यात मन सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा विचार करत असतं. यात व्यक्तीला एखाद्या भविष्याबाबत किंवा वर्तमानात काय होईल याची चिंता लागलेली असते. आर्थिक, मानसिक, नातेसंबंध, नोकरी या गोष्टींबाबत सतत विचार येतात. ही जरी एक मानसिक स्थिती असली तर शरीराला आतून पोखरते. एकूण व्यक्ती, मन आणि शरीर आतल्या आत गंभीर रूपाने आव्हानाचा सामना करत असतं. त्यामुळे शरीर अलर्ट मोडमध्ये जातं. एंझायटी झाल्यावर एंड्रोनालाईन आणि कोर्टिसोलसारखे तणाव वाढवणारे हार्मोन्स वाढतात. ज्यामुळे शरीरात काही लक्षणं दिसतात.
एंझायटीची लक्षणे
हृदयाचे ठोके वाढणे आणि छातीत जडपणा
मनात चिंता आणि ताण वाढू लागला की त्याचा परिणाम सर्वप्रथम शरीरावर दिसू लागतो. हृदयाचे ठोके वेगाने धडकणे, छातीत दडपण किंवा जडपणा जाणवणे ही एंझायटीची सामान्य लक्षणे मानली जातात.
श्वास घेण्यास त्रास
एंझायटीमुळे श्वासोच्छ्वास जलद होऊ शकतो. काही वेळा घुसमटल्यासारखे वाटणे किंवा नीट श्वास घेता न येणे अशी समस्या जाणवते. यामुळे चक्कर येणे आणि थकवा जाणवण्याची शक्यता वाढते.
पोटाच्या समस्या
जास्त चिंता आणि तणावाचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो. एंझायटीमुळे आतडे अधिक संवेदनशील होतात. तणावाच्या वेळी शरीरातील रक्तप्रवाह मांसपेशीकडे जास्त वळतो, त्यामुळे पचनक्रिया मंदावते. यामुळे मळमळ, पोट फुगणे किंवा वारंवार शौचालयाला जावं लागणे अशा समस्या उद्भवू शकतात.
स्नायूंमध्ये ताण आणि वेदना
भीती आणि तणावामुळे शरीर सतत सतर्क अवस्थेत राहते. त्यामुळे स्नायू आकुंचन पावतात आणि ताण निर्माण होतो. याचा परिणाम म्हणून मानदुखी, पाठ आखडणे किंवा शरीरात कडकपणा जाणवू शकतो.