शरीराचं वजन वाढण्यासोबतच पोटावरील चरबी वाढल्याने पोटही पुढे येतं. बेली फॅट म्हणजेच पोटावरील चरबी वाढल्याने डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो. तुम्हीही पोटावरील चरबी कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हिवाळ्यात काही खास पदार्थांचं सेवन करायला हवं. कारण या दिवसात या खास पदार्थांमुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. हिवाळ्यात काही पदार्थांमुळे चरबी कमी होते आणि एनर्जी जास्त वाढते. चला जाणून घेऊन हिवाळ्यात कोणत्या पदार्थांच्या मदतीने तुम्ही चरबी कमी करू शकाल. कारण हिवाळ्यात काही सिजनेबल भाज्यांमुळे वजन कमी करण्यास अधिक मदत मिळते.

फ्लॉवरची भाजी

वजन कमी करण्यासाठी फ्लॉवरची भाजी फायदेशीर ठरते. पोटावरील चरही बर्न करण्यासाठी हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी खावी. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असल्याने वजन कमी करण्यास अधिक मदत मिळते. त्यासोबतच फ्लॉवरमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात, ज्याने शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत राहतं. मेटाबॉलिज्म मजबूत असेल तर वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी भरपूर खावी.

मटर 

हिवाळ्यात मटारही चांगली भाजी असते. मटारमध्ये प्रोटीन्ससोबतच फायबरही भरपूर प्रमाणात असतं. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मटार सर्वात चांगली भाजी मानली जाते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात मटार खाऊ शकता. याने दिवसभरासाठी आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शिअमची तुमची गरज पूर्ण होते. 

गाजर

जर पोटावरील चरबी घटवायची असेल तर या हिवाळ्यात तुम्ही गाजराचं सेवनही करू शकता. गाजरांमध्ये हाय फायबर असतं. ज्याने भूक कमी होते आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळतं. गाजरातून आपल्याला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आढळतं जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. पोटाची समस्या आणि अ‍ॅसिडीटीची समस्याही गाजराने दूर होते. लाल गाजर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

आलं आणि लसूण

वरील उपायांसोबतच तुम्हाला पोटावरील चरबी दूर करण्यासाठी आलं आणि लसूणही फायदेशीर ठरतं. आलं आणि लसणात हाय अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे लोक फार जास्त खातात त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे आलं आणि लसणाचा आहारात समावेश करा. आल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी झाल्याने पोटावरील चरबीही वेगाने कमी होते.


 

Web Title: Trying to loose belly fat include these foods in your daily diet this winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.