(Image Credit : angieslist.com)
आपल्या जीवनशैली आणि आरोग्यावर वेगवेगळ्या पदार्थांचा थेट प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे वेगवेगळे पदार्थ खाऊन शरीराला पोषक तत्व मिळतात. मात्र, असेही काही पदार्थ असतात ज्यामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी करण्याचं काम करतात. शरीरात कॅल्शिअम कमी असेल तर हाडे कमजोर होतात. त्यासोबतच शरीरात इन्फेक्शनचा धोकाही अधिक वाढतो. याची जर योग्य माहिती नसेल तर शरीरात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होऊ लागते. thehealthsite.com ने अशाच काही पदार्थांबाबत माहिती दिली आहे. जे आपल्या शरीरातून कॅल्शिअम कमी करतात.
कॉफीचं अधिक सेवन
जर तुम्ही दिवसातून दोन कपांपेक्षा अधिक कॉफीचं सेवन करत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. कॉफीमध्ये कॅफीन भरपूर असतं. आणि कॅफीनच्या अधिक प्रमाणामुळे शरीरात व्हिटॅमिन बी १२ सोबतच व्हिटॅमिन डी ३ ला रोखलं जातं. जर तुम्हीही कॉफीचं फार जास्त सेवन करत असाल तर वेळीच ही सवय बंद करा. तसेच रिकाम्या पोटी कॉफी सेवन केल्याने कॅल्शिअम कमी होतं.
कोल्ड ड्रिंक्स कॅल्शिअमचे वैरी
वेगवेगळ्या कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करणं ही बाब अनेकांच्या लाइफस्टाईलचा भाग झाला आहे. पण प्रमाणापेक्षा जास्त कोल्ड ड्रिंक्सचं सेवन तुमच्या हाडांसाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात फॉस्फोरस असतं. याने कॅल्शिअमचं प्रमाण कमी होतं.
चॉकलेटचं अधिक सेवन
आपल्या रोजच्या सवयींमध्ये चॉकलेटला वेगळं स्थान आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खाणं पसतं असतं. पण रोज आणि तेही अधिक प्रमाणात चॉकलेट खाणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण चॉकलेटमध्ये असणारे पदार्थ कॅल्शिअमच्या निर्मितीला प्रभावित करतात. तसे तर रोज चॉकलेट खाण्याचे अनेक फायदेही आहेत. पण त्याचं प्रमाण कमी असावं.
अल्कोहोलचं अधिक सेवन
अल्कोहोलचं अधिक सेवन आरोग्यासाठी सर्वात घातक आहे. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण तरिही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. जर तुम्हीही रोज मद्यसेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण अल्कोहोलमुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होतं.