शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मृत्यूलाच शरण

By admin | Updated: February 18, 2015 00:12 IST

अखेर मृत्यूलाच शरण

अखेर मृत्यूलाच शरण
मेडिकलमधील घटना : उपचाराविना रुग्णाचा तडफडत मृत्यू

(मृतदेहाचा फोटो रॅपमध्ये आहे)
नागपूर : तो उपचारासाठी मदत मागत होता. परंतु कुणीच समोर आले नाही, उलट त्याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. दुपारी त्याने विभागाच्यासमोरच रक्ताची उलटी केली, परंतु सर्वांनीच दुर्लक्ष केले, अखेर तडफडतच त्याचा मृत्यू झाला. मानवतेला काळिमा फासणारी ही घटना कुठल्या चौकातील नाही तर आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाच्या मेडिकल रुग्णालयातील आहे.
सचिन कापसे (३२) रा. यवतमाळ असे मृताचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे, हा रुग्ण एचआयव्हीबाधित असल्याने त्याच्यावर उपचार करण्यात आला नसल्याची माहिती आहे.
मंगळवारी शासकीय सुटी असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) बंद होता. यामुळे सचिन दुपारी १२ वाजताच्या सुमारास आकस्मिक विभागात उपचारासाठी आला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार तो एकटाच होता. त्याला मेडिकलची माहिती नव्हती. यामुळे केसपेपर न काढताच तो थेट डॉक्टरांकडे गेला, आणि तपासण्याची विनंती करू लागला. त्याला धड बोलताही येत नव्हते. डॉक्टरांनी त्याला केसपेपर काढण्यास सांगितले, परंतु ते कुठे काढल्या जातात याची माहिती दिली नाही. तो रुग्ण इतरांकडे मदतीची मागणी करीत होता. परंतु कुणीच समोर आले नाही. अखेर सुरक्षा रक्षकाने त्याला आकस्मिक विभागाच्या बाहेर काढले. विभागाच्यासमोर बराच वेळ तो बसून होता, ये-जा करणाऱ्यांना उपचारासाठी गयावया करीत होता, अचानक त्याला रक्ताची उबळ आली. परंतु त्यानंतरही त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. अखेर ५ वाजताच्यासुमारास तिथेच त्याचा तडफडत मृत्यू झाला. परंतु त्यानंतरही मेडिकल प्रशासन ढिम्म होते. ६ वाजताच्यासुमारास जेव्हा मृतदेहाजवळ गर्दी व्हायला लागली तेव्हा मेडिकलच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पोलिसांना फोनवरून याची माहिती दिली. सायंकाळी ६.३० वाजता पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.