उन्हात गरम झालेल्या बाईक सीटवर बसणं मोठं घातक, चटका तर बसतोच, पण वडील होऊ न शकण्याचाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 10:50 IST2026-04-16T10:37:03+5:302026-04-16T10:50:45+5:30

Heat Can Damage Sperm Quality In Men:गरम सीटवर बसणं आरोग्यासाठी तर घातक आहेच, सोबतच याचा पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर देखील प्रभाव पडतो. याचा विचारच फारसं कुणी करत नाही.

Sitting on a heated bike seat is very dangerous, this could affect your sperm health | उन्हात गरम झालेल्या बाईक सीटवर बसणं मोठं घातक, चटका तर बसतोच, पण वडील होऊ न शकण्याचाही धोका

उन्हात गरम झालेल्या बाईक सीटवर बसणं मोठं घातक, चटका तर बसतोच, पण वडील होऊ न शकण्याचाही धोका

Heat Can Damage Sperm Quality In Men: उन्हाळ्यात बाहेर कडक उन्हात बाईक उभी केल्याने काय होतं हे आपल्याला चांगलंच माहीत असेल. पण उन्हाचा पाराच इतका वाढला आहे की, सगळ्यांनाच बाईक पार्क करण्यास सावली मिळेल असं नाही. आता गरम झालेल्या सीटवर बसल्यावर कसं वाटतं हेही आपल्याला माहीत असेल. पण याकडे गंभीरतेने फारसं कुणी बघत नाही. गरम सीटवर बसणं आरोग्यासाठी तर घातक आहेच, सोबतच याचा पुरूषांच्या प्रजनन क्षमतेवर देखील प्रभाव पडतो. याचा विचारच फारसं कुणी करत नाही.

cloudninecare वेबसाईटनुसार, शरीराच्या इतर अवयवांपेक्षा स्पर्म सेल्स तापमानाप्रति अधिक संवेदनशील असतात. हेच कारण आहे की, टेस्टिकल्स शरीराच्या बाहेर असतात. जेणेकरून त्यांचं तापमान शरीरापेक्षा २ ते ४ डिग्री कमी रहावं. असं असणं स्पर्मच्या योग्य विकासासाठी आवश्यक असतं. पण जेव्हा आपण उन्हात गरम गोष्टींच्या संपर्कात येतो, तेव्हा उष्णतेमुळे या अवयवाचं तापमान वाढतं. 

एक्सपर्टनुसार, जास्त काळ जास्त उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने स्पर्मची गुणवत्ता आणि संख्या दोन्हींवर प्रभाव पडू शकतो. जास्त उष्णतेमुळे स्पर्मची मुव्हमेंट स्लो होते, ज्यामुळे त्यांची टेस्टिकल्सपर्यंत पोहोचण्याची क्षमता कमी होते. इतकंत नाही तर जास्त गरमीमुळे स्पर्मच्या डीएनएचं देखील नुकसान होतं. 

हार्मोन्समध्ये असंतुलन

जास्त तापमानाचे दुष्परिणाम इतक्यावरच थांबत नाही. सतत शरीराच्या त्या भागाचं तापमान वाढत राहिल्याने हार्मोन्स असंतुलित होतात. टेस्टोस्टेरॉनसारखे आवश्यक हार्मोन, जे स्पर्म प्रॉडक्शनला नियंत्रित करतात, त्यांचं प्रमाण प्रभावित होतं. तसेच जास्त तापमानामुळे शरीरात ऑक्सीडेटिव स्ट्रेस वाढतो, ज्यामुळे टेस्टिकल्सचं नुकसान होतं. या दिवसात शरीरात पाणी कमी झालं तर याचा ब्लड फ्लो आणि हार्मोन ट्रान्सपोर्ट प्रभावित होतं. याने स्पर्म तयार होण्याची प्रक्रिया आणखी कमजोर होते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावं.

इतरही काही गोष्टींचा प्रभाव

जास्त गरम सीटवर बसण्यासोबतच पण सोबतच टाइट कपडे, सतत उन्हात राहणे यामुळेही स्थिती आणखी बिघडू शकते. त्यामुळेच हेल्थ एक्सपर्ट उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास आणि उन्हात जाणं टाळायला सांगतात. जर आपण रोज बाइकचा वापर करत असाल तर प्रयत्न करा की, बाईक जास्त वेळ उन्हात उभी ठेवू नका. कव्हरचा वापर करू शकता किंवा सावलीत उभी करा. 

Web Title : गरम बाइक सीट: बांझपन का खतरा, शुक्राणु को नुकसान, विशेषज्ञों की चेतावनी

Web Summary : गरम बाइक सीट शुक्राणु की गुणवत्ता और पुरुष प्रजनन क्षमता को नुकसान पहुंचा सकती है। गर्मी शुक्राणु की संख्या, गति, डीएनए और हार्मोन संतुलन को प्रभावित करती है। विशेषज्ञ ठंडा रहने, धूप से बचने और जोखिमों को कम करने के लिए बाइक कवर का उपयोग करने की सलाह देते हैं।

Web Title : Hot Bike Seat: Risks Infertility, Damages Sperm, Experts Warn

Web Summary : Hot bike seats can harm sperm quality and male fertility. Heat affects sperm count, movement, DNA, and hormone balance. Experts advise staying cool, avoiding sun exposure, and using bike covers to mitigate risks.