केवळ महिलाच नाही तर पुरूषही होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे शिकार, ५ संकेत दिसल्यास कानाडोळ करणं पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 09:44 IST2026-04-15T09:44:07+5:302026-04-15T09:44:35+5:30

Male Breast Cancer :ब्रेस्ट कॅन्सर केवळ महिलांनाच होऊ शकतो, हा लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. सत्य तर हे आहे की, पुरूषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.

Not only women's male too have breast cancer 5 early sign and cause | केवळ महिलाच नाही तर पुरूषही होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे शिकार, ५ संकेत दिसल्यास कानाडोळ करणं पडेल महागात

केवळ महिलाच नाही तर पुरूषही होऊ शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे शिकार, ५ संकेत दिसल्यास कानाडोळ करणं पडेल महागात

Male Breast Cancer : महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरच्या केसेस मोठ्या प्रमाणात आढळतात. पण याचा अर्थ असा नाही की, महिलांच्या ब्रेस्टचा आकार पुरूषांच्या ब्रेस्टपेक्षा वेगळा होतो म्हणून त्यांना हा कॅन्सर होतो. ब्रेस्ट कॅन्सर केवळ महिलांनाच होऊ शकतो, हा लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. सत्य तर हे आहे की, पुरूषांना देखील ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. जन्मावेळी ब्रेस्ट टिश्यू महिला आणि पुरूष दोन्हींमध्ये असतात, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर दोघांनाही होऊ शकतो. हेही तितकंच खरं आहे की, पुरूषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर दुर्मिळ आहे. पण अमेरिकेसारख्या शहरात दरवर्षी पुरूषांना ब्रेस्ट कॅन्सर झाल्याच्या साधारण २८०० केसेस समोर येत असतात. अशात या आजाराबाबत आपल्याला माहिती असली पाहिजे.  

ब्रेस्ट कॅन्सरची कारणे

मायो क्लीनिकनुसार, आतापर्यंत स्पष्टपणे हे समजू शकलेलं नाही की, ब्रेस्ट कॅन्सर का होतो. पण जेव्हा कोशिकांच्या डीएनए लेव्हलमध्ये बदल होतो, तेव्हा याच कोशिका कॅन्सर कोशिकांचं रूप घेतात. कोशिकांचा डीएनए हे ठरवतो की, त्याला काय करायचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कोशिकांचा डीएनए त्यांना वाढण्यास सांगतो आणि कधी कधी नष्ट होण्यासही सांगतो. पण कॅन्सर कोशिकांमध्ये डीएनएचे निर्देश बदलतात. त्यामुळे कोशिका अधिक संख्येने वाढतात. सामान्य कोशिका मेल्यानंतरही कॅन्सर कोशिका जिवंत राहतात. कॅन्सर कोशिका एक गाठ म्हणजे ट्यूमर तयार करतात. पुढे या कोशिका तुटून शरीरात इतर भागात पसरतात. जेव्हा कॅन्सर पसरतो, तेव्हा त्याला मेटास्टेटिक कॅन्सर म्हणतात. 

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे

निप्पलजवळ वेदना

निप्पलजवळ सतत वेदना होत असतील आणि त्या कमी होत नसतील, तसेच आसपासच्या त्वचेत ताण जाणवत असेल, तर हे गंभीर असू शकते. औषधांनीही आराम न मिळाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

निप्पलजवळ गाठ

निप्पलजवळ किंवा स्तनात कडक गाठ जाणवणे, त्वचा ताणली जाणे, जाड होणे किंवा मस्स्यासारखे काही दिसणे हे धोक्याचे संकेत असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता तपासणी करावी.

स्तनाच्या त्वचेत बदल

स्तनाच्या त्वचेत खळगे पडणे, सुरकुत्या येणे, त्वचा आकसणे किंवा पापुद्रा निघाल्यासारखी दिसणे हीही कॅन्सरची लक्षणे असू शकतात. अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नये.

त्वचेच्या रंगात बदल

स्तनाभोवतीच्या त्वचेचा रंग बदलणे जसे लाल, काळा, मळकट किंवा वेगळा दिसणे. हेही एक गंभीर लक्षण असू शकते. त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

निप्पलमधून स्त्राव

पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये निप्पलमधून द्रव, चिकट पदार्थ किंवा रक्त येत असेल, तर हे धोकादायक संकेत असू शकतात. अशावेळी त्वरित वैद्यकीय तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

कोणत्या पुरूषांना जास्त धोका

पुरूषांमध्ये वयानुसार ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो. हा आजार साधारण ६० वयाच्या आसपास पुरूषांमध्ये दिसू शकतो. तसेच जे पुरूष प्रोस्टेट कॅन्सरसाठी हार्मोन थेरपी किंवा अॅस्ट्रोजन असलेली औषधे घेतात त्यांनाही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. जर कुणाच्या परिवारात ब्रेस्ट कॅन्सरचा इतिहास राहिली असेल तर त्यांनाही याचा धोका असतो. काही लोकांमध्ये हा जेनेटिक असतो. ज्या लोकांना लिव्हर सिरोसिस आजार असतो, त्यांच्यात हार्मोनमध्ये संतुलन बदलतं. ज्यामुळे त्यांनाही याचा धोका असतो. लठ्ठपणामुळे शरीरात अॅस्ट्रोजन वाढतं, ज्यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो.

Web Title : पुरुषों को भी हो सकता है ब्रेस्ट कैंसर; इन लक्षणों को अनदेखा न करें!

Web Summary : ब्रेस्ट कैंसर सिर्फ महिलाओं को नहीं होता; पुरुषों को भी हो सकता है। निप्पल में दर्द, गांठ, त्वचा में बदलाव, स्त्राव और रंग में बदलाव जैसे लक्षणों पर ध्यान दें। उम्र, हार्मोन थेरेपी, पारिवारिक इतिहास, लिवर की समस्या और मोटापा खतरे को बढ़ाते हैं। जल्दी पता लगाना ज़रूरी है।

Web Title : Men can get breast cancer too; don't ignore these signs!

Web Summary : Breast cancer isn't just a women's disease; men can get it too. Watch for nipple pain, lumps, skin changes, discharge, and color changes. Risk increases with age, hormone therapy, family history, liver issues, and obesity. Early detection is crucial.