शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

बाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ; वेळीच 'या' चुका टाळा अन् तब्येत सांभाळा

By manali.bagul | Published: December 02, 2020 3:58 PM

National Pollution Control Day 2020:  तुमचा विश्वास बसणार नाही पण बाहेरच्या  प्रदूषित हवेइतकीच घरातील धूळ  शरीरासाठी घातक ठरू शकते.  

हवा प्रदूषण फुफ्फुसांसाठी जीवघेणं ठरू शकतं.याची तुम्हाला कल्पना असेल. IQAir २०१९ च्या रिपोर्टनुसार सगळ्यात जास्त प्रदूषण असलेल्या देशात भारत पाचव्या क्रमांकावर आहे.  प्रदूषणामुळे अस्थमा, हृदय रोग, श्वनसनाचे आजार होण्याची शक्यता असते. आज २ डिसेंबरला नॅशनल पोल्यूशन कंट्रोल दिन जगभरात साजरा केला जातो. प्रदूषणाला नियंत्रणात आणण्यासाठी  घरापासूनच सुरूवात करायला हवी.  कारण तुमचा विश्वास बसणार नाही पण बाहेरच्या  प्रदूषित हवेइतकीच घरातील धूळ  शरीरासाठी घातक ठरू शकते.  

हिवाळ्यात अनेकदा हात शेकण्यासाठी लोक कोळसा किंवा लाकूड जाळण्याची व्यवस्था करतात.  या आगीद्वारे पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी तसंच  घश्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हाला माहिती आहे का? बीडी-सिगारेट न पिणारे ३००० लोक फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मरण पावले आहेत. म्हणजेच धूम्रपान करणार्‍यांद्वारे पसरलेल्या प्रदूषणामुळे बर्‍याच निरपराध लोकांचा मृत्यू देखील होतो.

घरातही, प्रदूषणाचा धोका जास्त असतो. धूळीचे कण, पाळीव  प्राण्यांचे केस, माती, बूरशी हे सारे घटक कार्पेट किंवा पडद्यावर असतात. आपल्याकडे काही पाळीव प्राणी असल्यास, त्यातील स्वच्छतेची खास काळजी घ्या. हवेमध्ये पसरत असलेल्या बुरशीजन्य आणि कोंडाचे कण कमी करण्यासाठी दररोज त्यांची आंघोळ करा आणि अंथरुणालाही स्वच्छ ठेवा. पाळीव प्राणी आपल्या बेडरूमच्या बाहेर ठेवा. 

काळजी वाढली! फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस

स्वयंपाकघरातून निघणारे धुके आणि बाथरूमधील वास दूर करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन (एअर व्हेंट फॅन) वापरा.  चपलांमुळे बहुतेक घरात घाण येते. म्हणून नेहमी दाराजवळ पायपुसरणी ठेवा. घराच्या सदस्यांनी, मित्रांनी आणि नातेवाईकांनी प्रवेशाच्या वेळी त्याचा चांगला वापर केला पाहिजे.

 coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान

घरात वास येऊ नये म्हणून लोक सहसा एअर फ्रेशनर, अगरबत्ती, धूप आणि सर्व सुगंधित वस्तू वापरतात. या रासायनिक  गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी अनेकदा घातक ठरू शकतात. आपण पाहिलं असेल की घर झाडून काढल्यानंतर धूळीचे कण हवेत उडतात. श्वास घेताना ते थेट नाकातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. म्हणून, झाडूऐवजी व्हॅक्यूम क्लिनर वापरा. हे धूळीचे बारीक कण हवेत उडण्यापासून रोखेल आणि ते सहजतेने बाहेर काढेल.

फर्निचरपासून किचनपर्यंत स्वच्छतेसाठी मायक्रोबर डस्टिंग क्लॉथ वापरा. हे कापड सूती कापडापेक्षा जास्त कण शोषू शकते. घरात व्हेंटिलेशनची  पुरेशी सुविधा असावी. आपण आपल्या घराच्या खिडक्या आणि दारे ताजी हवेसाठी उघडी ठेवावीत. इनडोअर-आउटडोअर एअर एक्सचेंज करण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सpollutionप्रदूषण