Coronavirus updates corona virus may enter brain through nose study | काळजी वाढली! फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस

काळजी वाढली! फक्त फुफ्फुसंच नाही तर नाकावाटे मेंदूपर्यंत पोहचतोय करोनाचा व्हायरस

कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे संपूर्ण जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी विविध देशातील शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. अजूनही कोरोनाच्या प्रसाराबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून कोरोनाच्या प्रसाराबाबत एक खुलासा करण्यात आला आहे. नवीन संशोधनानुसार, कोरोनाचा व्हायरस नाकावाटे थेट मेंदूपर्यंत जातो आणि संपूर्ण शरीरावर परिणाम करत असल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. 'नेचर न्यूरोसायन्स' या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या संशोधनात कोरोना व्हायरस शरीराच्या विविध अवयवांपर्यंत कसा जातो याबाबत परिक्षण करण्यात आलं होतं. वास न येणे, चव नसणे, डोकेदुखी, थकवा अशा प्रकारची लक्षणे संबंधित रुग्णाला दिसू लागतात. मेंदूपर्यंत कोरोना पोहोचल्यानेच हा त्रास होत असल्याचे अभ्यास सांगतो. या संशोधनामुळे कोरोना आजाराच्या दरम्यान रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे काय आहेत आणि त्यांच्यावर उपचार कसे केले जावे याबाबत मदत होणार आहे.

जर्मनीतील चारिटे विद्यापीठातील संशोधकांकडून श्वासनलिकेची तपासणी करण्यात आली होती. या संशोधनात करोनामुळे मृत्यू झालेल्या ३३ रुग्णांचाही समावेश होता. यामध्ये ११ महिला आणि २२ पुरुष होते. मृतांचे सरासरी वय हे ७१.६ टक्के होते. तर, करोनाची लक्षणे आढळण्यापासून ते मृत्यू होईपर्यंतचे सरासरी ३१ दिवस ते जगले. संशोधकांना मेंदू आणि श्वसन नलिकेत सार्स-सीओव्ही२ आरएनए आणि प्रोटीन आढळले.

दरम्यान लस आल्यानंतर फ्रंटलाईन  लोकप्रतिनिधींना देण्यात यावी, अशी मागणी झाल्याची चर्चा सध्या सुरु आहे. लस आल्यानंतर ती पहिल्यांदा डॉक्टर आणि पोलिस कर्मचाऱ्यांनाच देण्यात येईल, असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कोरोना लस कुणाला द्यावी, त्याचं वर्गिकरण कसं व्हावं याचं संपूर्ण नियंत्रण केंद्र आणि राज्य सरकारकडे आहे. नियमांनुसारच लस देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असंही टोपे म्हणाले. Coronavirus: दिलासादायक! राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, तीन दिवसांत नवे रुग्ण अर्ध्यावर

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार  केल्या जात असलेल्या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर आले होते. अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. coronavirus: ऑक्सफर्डच्या कोरोनावरील लसीबाबत तर्कवितर्कांना उधाण, आता WHO ने केलं मोठं विधान

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus updates corona virus may enter brain through nose study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.