दिवसभर च्युइंग गम चघळत राहणं अजिबात नाही कूल, पुरूषांना चुकवावी लागू शकते मोठी किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:30 IST2026-04-23T12:24:54+5:302026-04-23T12:30:59+5:30
Does Chewing Gum Affect Male Fertility : च्युइंग गम चघळण्याची सवय जरी कूल वाटत असली तरी ही सवय आपल्यासाठी फार घातक ठरू शकते.

दिवसभर च्युइंग गम चघळत राहणं अजिबात नाही कूल, पुरूषांना चुकवावी लागू शकते मोठी किंमत
Does Chewing Gum Affect Male Fertility : तरूणांची हल्लीची लाइफस्टाईल फारच वेगळी झालेली बघायला मिळते. म्हणजे ट्रेडिंग स्टाईल, गोष्टी ते अधिक फॉलो करतात. कूल दिसण्यासाठी किंवा तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी बरेच लोक दिवसभर च्युइंग गम चघळत राहतात. च्युइंग गम चघळण्याची सवय जरी कूल वाटत असली तरी ही सवय आपल्यासाठी फार घातक ठरू शकते. कारण अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आलं की, च्युइंग गममुळे आपली प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
काय सांगतात एक्सपर्ट?
फर्टिलिटी एक्सपर्ट Dr Phoebe Howells यांच्यानुसार, च्युइंग गममुळे पुरूषांच्या फर्टिलिटीवर प्रभाव पडण्याचं मुख्य कारण म्हणजे यातील मायक्रोप्लास्टिक्स. हे फार छोटे छोटे असे प्लास्टिकचे कण असतात. जे आपल्या आजूबाजूच्या गोष्टी जसे की, पॅकेजिंग, कपड्यांवर येऊन चिकटतात. संशोधनात आढळून आलंय की, एका च्युइंग गममधून शेकडो मायक्रोप्लास्टिक कण शरीरात जाऊ शकतात, ज्यातील जास्तीत जास्त कण पहिल्या काही मिनिटांमध्येच रिलीज होतात. हेच कण हळूहळू शरीरात जमा होऊन हार्मोनल सिस्टीमला प्रभावित करतात.
पुरूष आणि महिलांवर कसा होतो प्रभाव?
डॉ. हॉवेल्स सांगतात की, मायक्रोप्लास्टिकमधील केमिकल्स जसे की, BPA, फ्थेलेट्स आणि PFAS शरीरातील हार्मोन्समध्ये गडबड करू शकतात. पुरूषांमध्ये याने स्पर्म काउंट, क्लालिटी आणि मुव्हमेंटमध्ये प्रभाव पडू शकतो. तर महिलांमध्ये याने ओव्ह्यूलेशन आणि मासिक पाळीवर प्रभाव पडू शकतो.
यूरोपिअन सोसायटी ऑफ ह्यूमन रिप्रॉडक्शन अॅन्ड एम्प्रिओलॉजीमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये आढळून आलंय की, फर्टिलिटी ट्रिटमेंट घेणाऱ्या महिलांच्या ६९ टक्के सॅम्पलमध्ये आणि पुरूषांच्या ५५ टक्के सॅम्पलमध्ये मायक्रोप्लास्टिक होते. तर एका दुसऱ्या संशोधनात आढळून आलंय की, पुरूषांच्या टेस्टिकल टिशूमध्येही मायक्रोप्लास्टिक होते.
इतरही काही गोष्टी धोक्याच्या
फक्त च्युइंग गममुळे ही समस्या होते असं नाही. चहाच्या टी-बॅग, कॉफी कप, प्लास्टिक कंटेनर आणि सिंथेटिक कपडे या गोष्टींमध्येही मोठ्या प्रमाणात मायक्रोप्लास्टिक्स असतात. खासकरून या गोष्टी गरम गोष्टींच्या संपर्कात आल्याने त्यातून जास्त कण निघतात. जे थेट शरीरात पोहोचतात. एक्सपर्टचं मत आहे की, प्लास्टिकला जीवनात पूर्णपणे हद्दपार करणे शक्य नाही, कारण ते सगळीकडे आहे. पण छोटे छोटे बदल करून, काही सवयी बदलून त्याचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो.