शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

पुरेशी झोप घ्या, अन्यथा 'या' गंभीर मानसिक आजाराचे रुग्ण व्हाल, आयुष्यभर त्रास देईल हा रोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 17:35 IST

एका नव्या अभ्यासानुसार कमी झोपल्यामुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या संशोधनात सहभागी झालेल्या जवळजवळ ६५.५ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला नीट झोप लागत नसल्याचं सांगितलं याचा संबंध मानसिक आरोग्याशी (Mental Health Problems) आहे.

सध्याच्या जीवनशैलीत लवकर झोप न येणं ही समस्या खूपच सामान्य झाली आहे. पण या समस्येकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर (Mental Health) होतो. अवेळी खाणं, कामाचा ताण, दिवस-रात्र काम करणं या सगळ्याचा तुमच्या झोपेवर खूप दीर्घकालीन परिणाम होतो. झोप न झाल्याने आपण खूप चिडचिड करतो, रागावतो, विनाकारण ओरडतो. आता विद्यार्थ्यांमध्येही ही समस्या दिसत आहे. एका नव्या अभ्यासानुसार कमी झोपल्यामुळे माणसाच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. या संशोधनात सहभागी झालेल्या जवळजवळ ६५.५ टक्के विद्यार्थ्यांनी आपल्याला नीट झोप लागत नसल्याचं सांगितलं याचा संबंध मानसिक आरोग्याशी (Mental Health Problems) आहे.

पियर-रिव्ह्यू जर्नल अनल्स ऑफ ह्यूमन बायोलॉजी (Annals of Human Biology) यामध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, अपुऱ्या झोपेमुळे विद्यार्थ्यांना नैराश्य (Depression) येण्याची शक्यता ४ टक्क्यांनी वाढते. या अभ्यासात सहभागी झालेल्या ५५ टक्के विद्यार्थ्यांना अक्सेसिव्ह डे टाइम स्लिपीनेस (Accessive Daytime Sleepiness) ही समस्या आहे. या नावाचा अर्थ असा आहे की दिवसभर झोप येणे. म्हणजे रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांना झोप येत राहते. त्यामुळेच या विद्यार्थ्यांना नैराश्य (Depression) येण्याची किंवा मनावर जबरदस्त ताण (Stress Level) जाणवण्याची शक्यता दुप्पट होते.

महिला किंवा विद्यार्थिनींना कमी झोप आणि ईडीएसचा अधिक त्रास होतो असं निरीक्षण या संशोधनात नोंदवण्यात आलं. त्याचा निष्कर्ष असा की महिलांना मानसिक त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतात. त्यांचं मानसिक आरोग्य झोप कमी झाल्याने अधिक प्रभावित होतं.

या संशोधनातील अभ्यासक फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ मॅटो ग्रोसो ब्राझीलमधील (Federal University of Mato Grosso Brazil) न्युट्रिशन विभागाचे प्रमुख डॉ. पाउलो रॉड्रिग्ज (Dr. Paulo Rodrigues) म्हणाले, ‘ झोपण्यासंबंधीच्या (sleep disorders) समस्या प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरू शकतात. त्यांच्या आजूबाजूला अनेक नकारात्मक घटना घडत असतात त्याचा त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यांची अनुपस्थिती वाढते'.

या संशोधनात संशोधकांनी १६ ते २५ वर्षे वयातील १ हजार ११३ पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभ्यासानुसार या विद्यार्थ्यांना झोपेचा दर्जा, ईडीएस, सामाजिक आर्थिक स्थितीबाबत विचारण्यात आलं. त्यांच्या बीएमआयचाही अभ्यास करण्यात आला. या सगळ्या घटकांचा आणि नैराश्य येण्याच्या कारणांचा संबंध लावून त्याचे निष्कर्ष तयार करण्यात आले.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सMental Health Tipsमानसिक आरोग्य