शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वजन कमी करण्यासाठी हिवाळ्यात आवर्जून खा भुईमूगाच्या शेंगा, जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 11:33 IST

हिवाळ्यात वेगवेगळ्या फळभाज्यांसोबतच भुईमूगाच्या शेंगा खाण्याचीही एक वेगळीच मजा असते. भुईमूगाच्या शेंगा खाणे फारच पौष्टिक आणि हेल्दी मानलं जातं.

हिवाळ्यात वेगवेगळ्या फळभाज्यांसोबतच भुईमूगाच्या शेंगा खाण्याचीही एक वेगळीच मजा असते. भुईमूगाच्या शेंगा खाणे फारच पौष्टिक आणि हेल्दी मानलं जातं. अनेकदा भाजलेल्या शेंगा किंवा तळलेल्या शेंगा खाल्ल्या असतील. पण भुईमूगाच्या उकडलेल्या शेंगा कधी खाल्ल्यात का? नसेल खाल्ल्या तर आता नक्की खा. खासकरुन ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी तर आवर्जून भुईमूगाच्या उकडलेल्या शेंगा खायला हव्यात.

अमेरिकन केमिकल सोसायटी द्वारे यावरक रिसर्च करण्यात आला. या रिसर्चमधून असं समोर आलं की, भाजून किंवा तळून भुईमूगाच्या शेंगा खाण्याऐवजी त्या उलडून खाल्ल्यास त्यात असलेल्या पोषक तत्त्वांचा फायदा चार पटीने जास्त होतो. त्यासोबतच या शेंगा उकडल्यावर त्यातील अॅंटी-ऑक्सिडेंटचं प्रमाणही वाढतं. चला जाणून घेऊ उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगा खाण्याचे फायदे.

वजन नियंत्रणात राहतं

भुईमूगाच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते. यात फॅट कमी असते, त्यामुळे या शेंगा खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती राहत नाही. तसेच यात कॅलरीही कमी असतात, अशात जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगांचा आहारात आवर्जून समावेश करा.

कमी होते चरबी

उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगांमध्ये भाजलेल्या किंवा तेलात तळलेल्या शेंगांपेक्षा अधिक फायबर असतं. जास्त फायबर असलेला आहार घेतल्याने खाल्लेलं अन्न चांगल्याप्रकारे पचन होण्यास मदत होते. त्यासोबतच मेटाबॉलिज्म मजबूत होतं. ज्यामुळे शरीरात जमा झालेली एक्स्ट्रा चरबी वेगाने बर्न होते. 

डोळ्यांसाठी फायदेशीर

भुईमूगाच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी६ आणि व्हिटॅमिन ए असतात. त्यामुळे जर हिवाळ्यात सकाळी उकडलेल्या भुईमूगाच्या शेंगांमध्ये किशमिश मिश्रित करुन खावे. याने डोळ्यांची दृष्टी वाढते.

हृदयरोगांपासून बचाव

भुईमूगाच्या शेंगांमध्ये पॉलीफेनॉलिक अॅंटी-ऑक्सिडेंट आणि रेल्वेराट्रॉल असतात. अशात भुईमूगाच्या शेंगा खाल्ल्याने हृदयरोग, कॅन्सर असे आजार आणि वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. त्यासोबतच या तत्वांमुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइड जास्त तयार होऊ लागतो. त्यामुळे या शेंगा खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. 

शेंगदाणे खाण्याचे फायदे

शेंगदाणे हे प्रोटीनचे मोठा स्रोत आहेत १०० ग्राम शेंगदाण्याच्या १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. शेंगदाण्यात अमिनो अम्ल असतात जे वाढीसाठी आणि विकासासाठी उपयोगी ठरतात. शेंगदाण्याचा सेवनाने पोटाचे आजार टळतात. शेंगदाण्याच्या पॉली फेनॉलिक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात तसेच शेंगादाण्यातील काही ठराविक घटकांमुळे पोटाचा कॅन्सरला प्रतिबंध होतो. शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो. तसेच शेंगादाण्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते व्हिटॅमिन ई शरीरातील शरीरातील पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण करते.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स