मांड्यांचे स्नायू कमजोर करत आहेत चिप्स, बर्गरसारखे फूड्स; वेळीच व्हा सावध नाही तर चालणं-फिरणं होईल अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 09:30 IST2026-04-19T09:29:51+5:302026-04-19T09:30:33+5:30

Junk Food Side Effects : एमआरआय स्कॅनमध्ये आढळून आलं की, चिप्स, बर्गर खाऊन मसल्समध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे शरीर कमजोर होतं. चला समजून घेऊया असं नेमकं कसं होतं.    

Junk food, Fast food damaging your body thigh muscle quality study reveals | मांड्यांचे स्नायू कमजोर करत आहेत चिप्स, बर्गरसारखे फूड्स; वेळीच व्हा सावध नाही तर चालणं-फिरणं होईल अवघड

मांड्यांचे स्नायू कमजोर करत आहेत चिप्स, बर्गरसारखे फूड्स; वेळीच व्हा सावध नाही तर चालणं-फिरणं होईल अवघड

Junk Food Side Effects : चिप्स, बर्गर, सोडा असलेले ड्रिंक्स, पॅकेज्ड फूड खाणं हल्ली फारच कॉमन झालं आहे. बरेच लोक दिवसभर काहीना काही चटर-पटर खात राहतात. हेच अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड तब्येतीसाठी किती घातक असतात, याबाबत हेल्थ एक्सपर्ट सतत सांगत असतात, पण लोक त्यांचे सल्ले हलक्यात घेतात आणि अनहेल्दी फूड खाणं सुरू ठेवतात. ऑफिसेसमध्ये तर दिवसभर चिप्स, फास्ट फूड, जंक फूड खाल्ले जातात. या गोष्टींनी लठ्ठपणा तर वाढतोच, सोबतच मांड्यांच्या मसल्सची म्हणजेच स्नायूंची क्वालिटी कमी होत चालली आहे. जर्नल रेडिओलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चमधून हे सांगण्यात आलंय. एमआरआय स्कॅनमध्ये आढळून आलं की, या गोष्टी खाऊन मसल्समध्ये चरबी जमा होऊ लागते, ज्यामुळे शरीर कमजोर होतं. चला समजून घेऊया असं नेमकं कसं होतं.    

संशोधकांनी ऑस्टिओआर्थरायटिसचा धोका असलेल्या ६१५ लोकांच्या एमआरआय डेटाचं विश्लेषण केलं. ज्यातून समोर आलं की, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचा थेट संबंध मसल फॅट इनफिल्ट्रेशनसोबत आहे. याचा अर्थ मसल्स बाहेर भलेही नॉर्मल दिसत असतील, पण त्यांच्यातील फायबरमध्ये चरबी जमा होऊ लागते. मसल्समध्ये फॅट जेव्हा वाढतं, तेव्हा त्यांची काम करण्याची क्षमता प्रभावित होते. ही समस्या अशा लोकांमध्ये अधिक दिसली ज्यांचं वजन नॉर्मल होतं. याचा अर्थ जंक फूडने वजन तर वाढतंच, सोबतच मसल्सही कमजोर होतात.    

मांड्यामधील स्नायू आपल्या शरीराला बॅलन्स देण्यास आणि चालण्या-फिरण्यासाठी सगळ्यात महत्वाचे असतात. संशोधकांचं मत आहे की, जर मसल्सची क्वालिटी अशीच कमी होत राहिली तर म्हातारपणात व्यक्तीची चालण्या-फिरण्याची शक्ती कमी होते. संशोधकांना आढळलं की, ६० वयाच्या आसपासच्या लोकांना याचा धोका अधिक असतो. अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमध्ये मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटचं प्रमाण खूप जास्त असतं. प्रोटीन आणि इतर आवश्यक पोषक तत्व अजिबात नसतात. हेच न्यूट्रिशनचं इम्बॅलन्स शरीराचं मस्कुलोस्केलेटल सिस्टीम कमजोर करतं.   

लठ्ठपणाचाही धोका संशोधकांना पुढे आढळलं की, शरीराचं एकूण वजन कंट्रोल केल्यानंतर सुद्धा हा धोका कमी होत नाही. रिसर्च सांगतो की, जर आपल्या कंबरेचा घेर जास्त असेल आणि आपण प्रोसेस्ड फूड खात असाल तर मसल्समध्ये फॅट जमा होण्याची प्रोसेस वेगाने होते. 

Web Title : चिप्स, बर्गर मांसपेशियों को कमजोर करते हैं; स्वस्थ चलने के लिए सावधान!

Web Summary : जंक फूड मांसपेशियों की गुणवत्ता को कम करता है, जिससे वसा जमा होती है। एमआरआई स्कैन से पता चलता है कि यह सामान्य वजन वाले लोगों को भी प्रभावित करता है, खासकर 60 के बाद गतिशीलता की समस्याओं का खतरा बढ़ जाता है। प्रोसेस्ड फूड में आवश्यक पोषक तत्वों की कमी होती है, जो मस्कुलोस्केलेटल प्रणाली को कमजोर करते हैं।

Web Title : Chips, burgers weaken muscles; be cautious for healthy mobility!

Web Summary : Junk food degrades muscle quality, leading to fat accumulation. MRI scans reveal this affects even those with normal weight, increasing the risk of mobility issues, especially after 60. Processed foods lack essential nutrients, weakening the musculoskeletal system.