शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या 'ही' एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:45 IST

How To Get Rid Of Constipation: आयुर्वेदिक उपचारांमध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांद्वारे पचन तंत्र तर मजबूत होतंच, सोबतच शरीरही डिटॉक्स होतं.

How To Get Rid Of Constipation : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या How To Get Rid Of Constipation: चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ही समस्या असते. पोट जर साफ झालं नाही तर पोटात दुखणं, पोट फुगणं, अ‍ॅसिडिटी अशा समस्या होतात. अशात पोट साफ होण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.

आयुर्वेदिक उपचारांमध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांद्वारे पचन तंत्र तर मजबूत होतंच, सोबतच शरीरही डिटॉक्स होतं. जर तुम्हालाही पोट साफ न होण्याची समस्या असेल तर रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास मदत मिळू शकते. 

१) लिंबू आणि मध

लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तेच मध बद्धकोष्ठता दूर करतं आणि पोटाला आराम देतं. एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाका. हे पाणी रात्री झोपण्याआधी प्या. यानं पचन तंत्र अॅक्टिव राहतं.

२) जिरे पावडर

जिऱ्याचा वापर वेगवेगळ्या उपचारांमध्ये केला जातो. जिऱ्यानं पोटातील सूज आणि गॅस कमी करण्यास मदत मिळते. तसेच जिऱ्यानं पचनक्रिया सुधारते. अर्धा चमचा जिरे पावडर एक ग्लास कोमट पाण्यात रात्री झोपण्याआधी प्या. सकाळी पोट लगेच साफ होईल. 

३) त्रिफळा चूर्ण

आयुर्वेदात त्रिफळा चुर्णाला पोट साफ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय मानलं आहे. या चुर्णानं आतड्या हेल्दी राहतात. एक चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास सकाळी पोट सहज साफ होईल.

४) अ‍ॅपल व्हिनेगर

अ‍ॅपल सायडर व्हिनेगरनं आतड्यांची सफाई होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्या. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य