शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

सर्दी, खोकल्यावर रामबाण उपाय १ ग्लास तुळशीचं दूध; इतर फायदे वाचून अवाक् व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 12:26 IST

काढा पिण्यापेक्षा दुधाचे सेवन केल्याने तुम्ही आजारांपासून चार हात लांब राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे तुळशीचे दूध. 

कोरोना काळात वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं गरजेचं आहे.  रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर कोरोनाच नाही इतर गंभीर आजारांपासून बचाव करता येऊ शकतो. फिट राहण्यासाठी अनेकजण दूध पितात. पण फक्त दूध पिण्यापेक्षा तुम्ही तुळशीच्या दूधाचे सेवन केलं तर सतत आरोग्याच्या तक्रारींसाठी दवाखान्यात जाण्याची गरज लागणार नाही.  काढा पिण्यापेक्षा दुधाचे सेवन केल्याने तुम्ही आजारांपासून चार हात लांब राहू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे तुळशीचे दूध. 

तुळस एक नैसर्गिक डिटॉक्सीफाइंग, क्लिंजिंग आणि प्यूरिफाइंग एजंट आहे. ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून बचाव करू शकता. त्याचबरोबर लिव्हर डिटॉक्स करण्यासाठीही तुळस मदत करते. दररोज तुळशीच्या १० ते १२ पानांचं सेवन करा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबुत होण्यास आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

तुळस कोलेस्ट्रॉल लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतं. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतं. तुळशीची पानं हृदयासाठी एका टॉनिकच्या स्वरूपात काम करतात. कॅल्शिअम मुबलक प्रमाणात असल्यामुळे तुळशीची पानं हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर यामध्ये एनलजेसिक इफेक्ट असतो. जो वेदना आणि सूज दोन्ही कमी करण्यासाठी मदत करतो.

तुळशीची पानं, आलं आणि जेष्ठमध बारिक करून त्यामध्ये मध एकत्र करून खा. त्यामुळे ताप, डोकेदुखी, घशात होणारी खवखव, सर्दी, खोकला यांसारख्या समस्या दूर होतात. तुळशीच्या पानांच्या अर्कात मध एकत्र करून प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. त्याचबरोबर क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, अस्थमा यांसारख्या श्वासाशी निगडीत आजारांवरही फायदेशीर ठरतो. 

असं तयार करा तुळशीचं दूध

सगळ्यात आधी दिड ग्लास दूध उकळून घ्या उकळलेल्या दुधात ८ ते १० तुळशीची पानं घाला. हवं तर तुम्ही या दुधात हळद किंवा मध घालू शकता. दूध पूर्णपणे उकळल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यानंतर या दुधाचे सेवन करा. तुळशीच्या दुधाच्या सेवनाने मायग्रेनची समस्या दूर होते. तर तुम्हाला ही समस्या सतत उद्भवत असेल तर रोज एक ग्लास तुळशीचे दूध प्यायल्यास समस्या कमी होईल.

हे पण वाचा :

२ दिवसांनी पहिल्या कोरोना लसीचे रजिस्ट्रेशन; सगळ्यात आधी लसीकरण कोणाचं? जाणून घ्या

अवघ्या जगाचे डोळे कोरोना लसीकडे; WHO च्या तज्ज्ञांचे मोठं विधान

लढ्याला यश! कोरोनाला नष्ट करण्यासाठी 'चमत्कारीक लस' तयार; 'या' देशातील तज्ज्ञांचा दावा

युद्ध जिंकणार! कोरोनाचं नवीन औषध 'एविप्टाडील' आलं; फक्त ४ दिवसात प्रभावी ठरणार, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य