खुशखबर! केंद्राने पहिल्यांदाच जाहीर केला कोरोना लसीकरणाचा प्लॅन; सगळ्यात लसीकरण कोणाचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 06:25 PM2020-12-08T18:25:28+5:302020-12-08T18:30:03+5:30

CoronaVirus Vaccine News & Latest Updates : लसीकरण ही फक्त राज्याची अथवा केंद्राची जबाबदारी नाही, त्यामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज स्पष्ट केलं आहे.

Health ministry plan for corona vaccination as 8 covid vaccines are coming who will get priority dose 5 | खुशखबर! केंद्राने पहिल्यांदाच जाहीर केला कोरोना लसीकरणाचा प्लॅन; सगळ्यात लसीकरण कोणाचं?

खुशखबर! केंद्राने पहिल्यांदाच जाहीर केला कोरोना लसीकरणाचा प्लॅन; सगळ्यात लसीकरण कोणाचं?

Next

गेल्या ११ महिन्यांपासून कोरोनाची लस तयार करण्यासाठी जगभरातील देशाचे प्रयत्न सुरू होते. आता भारतात दोन विदेशी आणि एक स्वदेशी अशा मिळून तीन कंपन्यांनी आपात्कालीन  लसीकरणासाठी सरकारकडून परवानगी मागितली आहे. संगणकीकृत पद्धतीने लसीचं वितरण होईल, असं आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. लसीकरण ही फक्त राज्याची अथवा केंद्राची जबाबदारी नाही, त्यामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज स्पष्ट केलं आहे.

मोदी सरकारच्या वतीने आरोग्य मंत्रालयातर्फे मंगळवारी देशातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. भारतात पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं.भारतात एकूण 8 लशींचं उत्पादन सुरू आहे. या कोरोना लशी लवकरच उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. 

लसीकरण सुरू केल्यानंतर प्रथम कुणाला कोरोनाची लस टोचता येणार याचा प्लॅन आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे. भारतात एकूण 8 लशींचं उत्पादन सुरू आहे. या कोरोना लशी लवकरच उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहेत. आता लसीकरण सुरू केल्यानंतर प्रथम कुणाला कोरोनाची लस टोचता येणार याचा प्लॅन आरोग्य मंत्रालयाने तयार केला आहे.

सुरूवातीला फ्रंटलाईन वर्कर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाला लस टोचली जाणार आहे.  यामध्ये सशस्त्र दल, पोलीस, होम गार्ड, सिव्हिल डिफेन्स, डिझॅस्टर मॅनेजमेंटमधले स्वयंसेवक, तसंच महापालिका, नागरी संस्थांमधले 50 वर्ष वयाच्या पुढचे कर्मचारी यांना कोरोनाची लस मिळेल.

 आता 'स्वदेशी' कंपनीने मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी; केंद्र कोणाला प्राधान्य देणार?

केंद्र सरकारने लसीकरण योग्य पद्धतीने राबवण्यासाठी  एक तज्ज्ञ समिती नेमली होती. National Expert Group on Vaccine Administration कमिटी म्हणजे NEGVAC ने या पद्धतीने लोकसंख्येचं वर्गीकरण करून प्राधान्यक्रम कुणाला हे ठरवलं आहे. आरोग्य मंत्रालय या समितीच्या सूचनांचं पालन करूनच लसीकरण मोहीम राबवेल, अशी माहिती आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. 

आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात

आता 'स्वदेशी' कंपनीने मागितली कोरोना लसीकरणाची परवानगी

फायजर इंक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानंतर आता हैदराबादमधील फार्मास्युटिकल कंपनी भारत बायोटेकनेही कोरोना लसीच्या आपत्कालीन  स्थितीतील वापरासाठी परवानगी मागितली आहे.  भारत बायोटेकने केंद्रीय औषधी नियामक मंडळाकडे या लसीच्या परवानगीसाठी निवेदन दिलं आहे. भारत बायोटेक ही लसीसाठी परवानगी मागणारी तिसरी कंपनी आहे. देशभरातील लसीच्या चाचण्यांचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण करण्यावर कंपनीचा भर होता. आता केंद्र सरकारकडून कोणत्या लसीच्या आपत्कालीन  वापरासाठी परवानगी मिळणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. 

Web Title: Health ministry plan for corona vaccination as 8 covid vaccines are coming who will get priority dose 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.