आनंदाची बातमी! 'या' देशात आजपासून सामान्यांना मिळणार कोरोनाची लस; भारतातही तयारीला सुरूवात

By manali.bagul | Published: December 8, 2020 11:34 AM2020-12-08T11:34:29+5:302020-12-08T11:47:25+5:30

कोरोना व्हायरसच्या माहामारीविरूद्ध लढण्यासाठी संपूर्ण जगभरातील देशात प्रयत्न सुरू आहे. भारतातही लसींची चाचणी ही शेवटच्या टप्प्प्यात पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये आजपासून सर्व सामान्य नागरिकांना लस देण्यासाठी सुरूवात केली जाणार आहे. फायजर आणि बायोएनटेक कंपनीकडून विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीचे लसीकरण आजपासून सूरू होणार आहे.

ब्रिटनमध्ये ६१,००० पेक्षा जास्त मृत्यू हे कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे झाले आहेत. प्रधानमंत्री बोरिस जॉनसन यांनी संयुक्त राज्य अमेरिका या युरोपीय संघाकडून फायजर / बायोएनटेकच्या लसीला रोल-आऊट करून या जीवघेण्या आजाराविरूद्ध एक मोहिम सुरू करण्याची माहिती दिली होती.

ब्रिटनने एका आठवड्यापेक्षाही कमी वेळात लसीच्या वापरासाठी मंजूरी दिली आहे. आता राष्ट्रीय स्वास्थ्य सेवा (एनएचएस) च्या माध्यमातून लोकांपर्यंत ही लस पोहोचवण्याची तयार सुरू आहे.

ब्रिटेन ने फाइजर / बायोएनटेकला ४० मिलियन डोस देण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक व्यक्तीला दोन डोजची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी २० मिलियन लोकांना लस पुरेशी ठरेल. जवळपास ८००,००० डोस पहिल्या आठवड्यात उपलब्ध होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सगळ्यात आधी लस ही आरोग्य सेवेतील कर्मचारी वर्गाला दिली जाणार आहे. त्यानंतर वृद्धांना लस दिली जाईल.

एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारतात फायजर इंक आणि एक्स्ट्राजेनेकाद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोना व्हायरसच्या लसीची प्रतिक्षा आहे. जेणेकरून आपातकालिन स्थितीत या लसीचा वापर केला जाऊ शकतो.

दरम्यान सीरम इन्स्टिट्युटने भारतीयांना कोरोनावरील लस देण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. कोरोनावरील लस भारतात सर्वप्रथम वितरीत करण्याच्या दृष्टीने काम सुरू असल्याचं सीरम इन्टिट्युटने याआधी सांगितलं आहे. त्यानंतर आता फायझर पाठोपाठ कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितल्याची माहिती समोर आली आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लस "कोविशील्ड" (Covishield) च्या आपत्कालीन वापराला अधिकृत मान्यता देण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (डीजीसीआय) अर्ज केला आहे. असा अर्ज करणारी ही स्वदेशी पहिली लस आहे. सीरम संस्थेला परवानगी मिळाली तर भारतातील ही पहिली स्वदेशी लस ठरू शकेल.

अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या निर्माण झालेली वैद्यकीय गरज आणि लोकांचं हित अशी कारणं सीरम इन्स्टिट्यूटने डीजीसीआयकडे सोपवण्यात आलेल्या अर्जात दिली आहेत. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेल्या ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी मिळाली आहे.

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांनी सांगितले होते की, आमच्या कंपनीचे लक्ष्य अ‍ॅस्ट्राजेनेकाची लस सर्वात प्रथम भारतात उपलब्ध करून देण्याचे आहे.

त्यानंतर जगातील इतर देशांना पुरवठा करण्याचा विचार आहे. सीरम इन्स्टिट्युटकडून अ‍ॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीचे उत्पादन भारतात सुरू आहे.