जीमला जायचा कंटाळा येत असेल तर 'या' १५ मिनिटांच्या एक्सरसाइजने वजन करू शकता कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:58 AM2020-01-22T11:58:06+5:302020-01-22T11:58:38+5:30

सगळ्या वयोगटात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असते.

Full body fitness workout at home in just 15 minutes | जीमला जायचा कंटाळा येत असेल तर 'या' १५ मिनिटांच्या एक्सरसाइजने वजन करू शकता कमी

जीमला जायचा कंटाळा येत असेल तर 'या' १५ मिनिटांच्या एक्सरसाइजने वजन करू शकता कमी

Next

सगळ्या वयोगटात लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत असते. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे ही समस्या सगळ्यात जास्त दिसून येते. जरी तुम्ही डाएट करायचं ठरवलं तरी ऑफिसमध्ये किंवा मित्रमैत्रिणींसोबत जेवत असताना डाएट फॉलो करणं शक्य होत नाही. किंवा असा विचार जरी केला तरी वेगवेगळे पदार्थ रोज खाण्यात येत असल्यामुळे वजन नियंत्रणात राहत नाही. तुम्हाला सुद्धा वजन वाढण्याच्या समस्येचा सामना  करावा लागत असेल तर तुम्हाला टेंशन घ्यायचं काही कारण नाही. तुम्हाला व्यायाम करायला किंवा जीमला जायला वेळ मिळत नसेल तर स्वतःसाठी फक्त १५ मिनिटं वेळ देऊन तुम्ही  तुमचं वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पध्दतीने व्यायाम केल्यास तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. 

Image result for overweight(Image credit-mentalfloss)

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज व्यायाम करणं गरजेचं आहे. पण अनेक लोकं व्यायाम न करण्यासाठी कारणं शोधत असतात. जर तुम्ही सुद्धा रोज व्यायाम करू शकतं नसाल तर  स्वतःसाठी फक्त १५ मिनिटं वेळ देऊन तुम्ही फिट राहू शकता. १५ मिनिटांचा व्यायाम तुमच्या संपूर्ण शरिराला व्यायाम देणारा असेल . जर तुम्ही १५ मिनिटं वेळ काढून हा व्यायाम केला तर लठ्ठपणाचे शिकार होण्यापासून वाचू शकता. (हे पण वाचा-Health Alert: चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांंनी गमावला जीव, भारतातही अलर्ट जारी!)

सूर्य नमस्कार

Image result for surya namaskar

(image credit- styleatlife)

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज सुर्य नमस्कार करणं  गरजेचं आहे. त्यामुळे स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कारांचा व्यायाम मदत करतो.  जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच सुर्य नमस्काराचा व्यायाम घरच्याघरी करायला  सुरूवात करा. हा व्यायाम सुरू करण्या आधी ५ मिनिटं वॉर्मअप करा. ( हे पण वाचा-तुमच्या हिरड्यांचा रंग काळा आहे का? जाणून घ्या याची कारणे....)

Image result for surya namaskar

(image credit- thriive.in)

रोज सुर्य नमस्कार केल्यामुळे शरीरातील पाचनक्रिया चांगली कार्य करते. त्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद वाढते. त्यासाठी सुर्य नमस्कार  करणं गरजेचं आहे.  तुमचे शरीर  आणि स्नायू लवचीक  राहण्यासाठी सुर्य नमस्काराचा व्यायाम करणं फायदेशीर ठरतं असतं. 


 

प्लॅक एक्सरसाइज

Image result for plank exercise

जर तुमच्या शरीरात स्टॅमिना कमी असेल तर तुम्ही प्लॅंक एक्सरसाइज करू शकता. या व्यायामामुळे  पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे तुमच्या कमरेच्या भागातील म्हणजेच पेल्विकचे मसल्स मजबूत होण्यास मदत होईल. प्लॅक एक्सरसाइजचे अनेक फायदे आहेत. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्लॅक एक्सरसाइज तुम्हाला करता येतील. कोणत्याही मशीनचा वापर न करता घरच्याघरी तुम्ही हा व्यायाम करू शकता.

Web Title: Full body fitness workout at home in just 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.